शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मुरलीधर महाराजांना अटक का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 23:19 IST

महिला भक्तांसोबत रासलीलेसाठी चर्चेत आलेल्या मुरलीधर महाराजांना जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत अटक व्हायलाच हवी होती, असे मत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक श्याम मानव यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देमानव यांचा सवाल : तर पोलीस अधिकाºयाविरुद्धच कारवाई!

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महिला भक्तांसोबत रासलीलेसाठी चर्चेत आलेल्या मुरलीधर महाराजांना जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत अटक व्हायलाच हवी होती, असे मत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक श्याम मानव यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले. जादूटोणाविरोधी कायद्याच्या कलम ३(२) मध्ये या कारवाईची तरतूद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.''स्वत:त विशेष अलौकिक शक्ती असल्याचे अथवा कुणाचा तरी अवतार असल्याचे वा स्वत:च पवित्र आत्मा असल्याचे भासवून किंवा त्याच्या नादी लागलेल्या व्यक्तीस पूर्वजन्मी तू माझी पत्नी, पती वा प्रेयसी, प्रियकर होता असे सांगून, अशा व्यक्तिशी लैंगिक संबंध ठेवणे तसेच मूल न होणाºया स्त्रीला अलौकीक शक्तीद्वारा मूल होण्याचे आश्वासन देऊन लैंगिक संबंध ठेवणे'' या कृत्यांसाठी वर उल्लेखित कलमान्वये जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल होतात, अशी माहिती मानव यांनी दिली.चांदूरबाजार तालुक्यातील आसेगाव पूर्णा पोलिसांच्या हद्दीतील येलकीपूर्णा येथे मुरलीधर महाराजांचा मठ आहे. मुरलीधर महाराज यांनी मठात वास्तव्यास असलेल्या त्यांच्या भक्त तरुणींशी शरीरसंबंध प्रस्थापित केले होते. तळघरात असलेल्या स्नानगृहात ही रासलीला चालायची.महाराजांचा 'स्टायलीश लूक'अमरावती : खळबळ उडविणाºया या घटनेच्या काही चित्रफिती पुराव्यादाखल व्हायरल करण्यात आल्या होत्या; तथापि आम्ही स्वमर्जीने मुरलीधर महाराजांशी संबंध ठेवले असल्याचे संबंधित तरुणींनी बयाण दिल्यामुळे त्या संबंधांवर कारवाई करता येणार नाही, अशी भूमिका घेऊन अमरावती ग्रामीण पोलिसांनी मुरलीधर महाराजांना रान मोकळे करून दिले होते.महाराजांनी त्यानंतर सोवळे, उपरणे, फेटा या 'धार्मिक' वेशाऐवजी जीन्स, टी शर्ट आणि गॉगल असा 'स्मार्ट' वेश परिधान करणे सुरू केले. त्यांनी दाढीही काढली. पूर्वी महाराज असलेले मुरलीदास नारायणराव तायडे हे 'स्टायलीश लूक' असलेल्या पुरुषात परिवर्तीत झाले. काही टभक्तांसोबत त्यांनी अमरावती जिल्हा सोडला. राज्याबाहेर ज्या स्थळी ते वास्तव्यास होते, तेथील त्यांची छायाचित्रे मध्यंतरी व्हॉटस अ‍ॅपवर प्रसारीत झाली होती. त्यातही त्यांचा 'लूक' 'स्टायलीश'च होता.एसपी करणार का कारवाई?जादूटोणाविरोधी कायद्याचा मसुदाच ज्यांनी तयार केला, त्या श्याम मानव यांनी याप्रकरणी कारवाई व्हायलाच हवी होती, असे विधान केले आहे. कायद्यातील तरतुदीही त्यांनी सुस्पष्टपणे सांगितल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार आता जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत कारवाई करणार काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.-तर अधिकाऱ्यावर कारवाईहे प्रकरण तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्या देखरेखीत पार पडले होते. त्यावेळी त्यांनी गुन्हे दाखल करावयास हवे होते. दक्षता अधिकाऱ्यांसमोर हे प्रकरण गेल्यास गुन्हे नोंदविणे हे त्यांचेही कर्तव्य ठरते, असे मानव यांनी स्पष्ट केले. पूर्वी जे झाले नाही, ते आताही होऊ शकते. मुरलीधर महाराजांवर गुन्हे नोंदवून अटक केली जाऊ शकते. पोलिसांनी चूक सुधारावी. पोलीस टाळाटाळ करणार असतील, तर संबंधित जबाबदार पोलीस अधिकाºयाविरुद्ध कारवाईच्या उपलब्ध तरतुदीनुसार अंधश्रद्धा निर्मूलन समिती कूच करेल, असा इशाराही त्यांनी दिला.