शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

का ओढविली पोलिसांवर नामुष्की?

By admin | Updated: August 26, 2015 00:02 IST

अमरावतीपासून २० किमी दूर असलेल्या माहुली गावात मंगळवारी दिवसभर तणावाची स्थिती होती.

गणेश देशमुख अमरावतीअमरावतीपासून २० किमी दूर असलेल्या माहुली गावात मंगळवारी दिवसभर तणावाची स्थिती होती. गावकऱ्यांचा पोलिसांवर जहाल रोष निर्माण झाल्यामुळे शस्त्रसज्ज पोलिसांना शेतांच्या धुऱ्याने पळावे लागले. कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्यासाठीच नेमणूक असलेल्या पोलीसांना गावात जाण्याचे धैर्य उरू नये, जीव मुठीत घेऊन माहुली ठाण्याचा आधार घ्यावा लागावा, ही बाब चिंतनीयच!ज्यांच्या शिरावर कायदा अबाधित राखण्याची जबाबदारी होती ते पोलीस गावाबाहेर थांबलेले आणि आमदारांसह महसूल प्रशासनाची चमू कायदा सुव्यवस्था राखण्याच्या कार्यात गावात गुंतलेली, असे आगळे चित्र मंगळवारी माहुलीत होते. ज्वालामुखीसमान खदखदणाऱ्या गावकऱ्यांसमोर जाणे, त्यांचे समाधान करणे हे कार्य जितके धोक्याचे तितकेच ते लढवय्य बाणा अन् चाणाक्ष बुद्धीमत्तेचा कस लावणारेही होते. आमदार, जिल्हाधिकारी आणि त्यांच्या चमूने हे कार्य लिलया पार पाडले. साहिलचा अंत्यविधी होईस्तोवर ही मंडळी आत्मविश्वासाने तेथे होती. तथापि, हे हे धाडस पोलीस दाखवू शकले नाहीत. पोलिसांवर उद्भवलेला प्रसंग बाका होता. त्याचे समर्थन होऊ नयेच. पण ही स्थिती पोलिसांनीच स्वत:वर ओढवून घेतली असेल तर त्याचे 'आॅपरेशन' जरूर व्हायलाच हवे.सामान्य पोलिसांवर संकट ओढवत असले तर अशावेळी धुरा त्यांच्या सेनापतीने सांभाळायला हवी. घटनास्थळी जातीने हजर राहून वरिष्ठांनी स्थिती हाताळणे अपेक्षित आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा रुबाब मोठा असतो. त्यांचे अधिकार व्यापक असतात. अवघ्या पोलिसांचे ते प्रेरणास्थान असतात. त्यांची बुद्धीमत्ताही कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपेक्षा जास्त असते. अशा बिकट समयी स्थिती कशी हाताळायची, नियंत्रण कसे मिळवायचे, हारलेली बाजी कशी जिंकायची याचे प्रशिक्षणच वरिष्ठांनी स्वकृतीतून कनिष्ठांपुढे सादर करायचे असते. माहुलीच्या घटनेत वरिष्ठांना ही संधी होती, मात्र त्यांनी ती गमावली. लोकविश्वास परत मिळवावा!गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला म्हणून त्यांच्याविरुद्ध आकसाने खटले भरणे हा सुदृढ लोकशाही जपण्यासाठीचा उपाय असू शकत नाही. आयुष्यातील संघर्षाचा सामना करून थकल्यावर जीवन संपविणाऱ्या 'शेतकरी जमाती'तील मनुष्यप्रण्यांची संख्या माहुली गावात जास्त आहे. कुणाविरुद्ध आवाज काढण्याची या जमातीची रीतच नाही. तरीही ही मंडळी इतकी का संतापली? का त्यांनी इतका थयथयाट केला? त्यांच्यात हा आक्रोष कुठल्या कारणाने आला, याची उत्तरे शोधणे आणि त्यावर उपचार करणे हा या समस्येवरील खरा उपाय. शेतकरी, शेतमजुरांची ७० ते ८० मुले माहुली गावातून रोज अमरावती येतात. सकाळी ६.४५ वाजता ते त्या गावातून बसगाडीने निघतात. त्यांच्यासाठी वेगळी बसफेरी द्यावी, अशा लाख विनंत्या त्यांनी प्रशासनाला केल्या होत्या.