शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

बेलोरा विमानतळाचा विकास का रखडला, निधी गेला कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2022 00:01 IST

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे विभागीय कार्यकारी संचालक यांना चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.  माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या याचिकेनुसार, राज्याचे सातवे मोठे व विभागीय मुख्यालयाचे शहर अमरावती येथे विमानतळ उपलब्ध झाले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बेलोरा विमानतळाची १३ वर्षांपासून विकासकामे सुरू होऊनही आजतायागत विमानतळ पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे विकास का रखडला आणि निधी गेला कुठे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी केली. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे विभागीय कार्यकारी संचालक यांना चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या याचिकेनुसार, राज्याचे सातवे मोठे व विभागीय मुख्यालयाचे शहर अमरावती येथे विमानतळ उपलब्ध झाले नाही.  राज्यात इतर विभागीय मुख्यालयेच नव्हे, तर नांदेड, लातूर, कोल्हापूर, जळगाव, सिंधुदुर्ग, शिर्डी, गोंदिया आदी जिल्हा व तालुकास्तरावर विमानतळ  झाले आहे. डॉ. सुनील देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये विमानतळ विकासासाठी पीआयएल क्रमांक ४८/ २०२२ अन्वये जनहित याचिका दाखल करून न्यायालयीन लढा उभारला आहे. ही जनहित याचिका बुधवारी नायमूर्ती जी.ए. सानप व न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या खंडपीठाने सुनावणीकरिता दाखल करून घेतली. ॲड. प्रवीण पाटील यांच्यामार्फत उच्च न्यायालयात एप्रिल २०२२ मध्ये ती सादर करण्यात आली, हे विशेष.

म्हणून एटीआर-७२ चे ‘टेक ऑफ’रखडले विमानतळ, धावपट्टीचे ओएलएस सर्वेक्षण करून विस्तृत आरखडा तयार करण्यात आला. शेवटच्या टप्प्यात एटीआर-७२ विमानाचे उड्डाणासाठी नाइट लँडिंग सुविधा, धावपट्टी १३७२ मीटर लांबीऐवजी १८५० मीटरपर्यंत करण्यात आली. विकासकामांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निधी उपलब्ध केला. १३ जुलैे २०१९ विमानतळ विस्तारीकरणाची पायाभरणी करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मात्र, धावपट्टीच्या विस्तारीकरण अंतिम टप्प्यात रखडले. नऊ कोटींअभावी डांबराचा सिल्क कोट तयार झाला नाही. त्यामुळे एटीआर-७२ चे ‘टेक ऑफ’ होऊ शकले नाही. आता माजी राज्यमंत्री सुनील देशमुख यांनी न्यायालयीन लढा हाती घेतला आहे.

 

टॅग्स :Airportविमानतळ