शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

रिंगणातील अपक्ष कुणाचे बिघडवणार गणित? अमरावतीत १२० अपक्ष उमेदवार मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 12:27 IST

Amravati : अमरावती महापालिकेच्या २२ प्रभागांत ८७ जागांसाठी ६६१ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचे ५४१ आणि १२० अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावती महापालिकेच्या २२ प्रभागांत ८७ जागांसाठी ६६१ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचे ५४१ आणि १२० अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. काही उमेदवार असे आहेत ज्यांना पक्षाकडून तिकीट मिळाले नव्हते, तरीही ते निवडणूक मैदानात उतरले आहेत. मात्र अपक्ष उमेदवारांमुळे प्रस्थापित राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे गणित बिघडण्याची दाट शक्यता आहे. अपक्षांची उमेदवारी ही यंदा निवडणुकीतील समीकरणे बदलू शकतात, असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे. अमरावती महापालिका निवडणुकीत १९९२ आणि १९९७ मध्ये अपक्ष उमेदवारांचा बोलबाला होता, हे विशेष.

अमरावती महापालिकेच्या निवडणुकीसाठी केवळ एक दिवस उरलेला आहे. १५ जानेवारी रोजी मतदान तर उमेदवारांच्या बाजूने प्रचार सुरू आहे. तसेच प्रशासनाच्या बाजूनेही तयारी पूर्ण झाली आहे. १९९२ च्या निवडणुकीत काँग्रेसने २७ जागा जिंकल्या होत्या, तर २८ अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. १९९७ च्या निवडणुकीत २५ अपक्ष उमेदवार विजयी झाले होते, तर २०१७च्या निवडणुकीत केवळ एका अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला होता.

मागील सहा निवडणुकीतील उमेदवारांचा लेखाजोखा

महापालिका निवडणुकीत १९९२ मध्ये सर्वाधिक २८ अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. १९९७ मध्ये २५ आणि २००२ मध्ये ५, २००७ मध्ये ७, २०१२ मध्ये ८ आणि २०१७ च्या निवडणुकीत एका उमेदवाराने विजय मिळवला होता. १९९२ आणि १९९७ च्या निवडणुकीत वॉर्ड प्रक्रिया होती, ज्यामुळे अपक्ष उमेदवारांना अधिक संधी होती. त्यानंतर प्रभाग रचना पद्धतीने मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली.

अपक्ष उमेदवारांचे 'मैं नही तो तू भी नहीं'

अमरावती महापालिका निवडणुकीत प्रचारादरम्यान २२ प्रभागांत १२० अपक्ष उमेदवारांनी धूम केली. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांना अपक्षांची उमेदवारी प्रचंड त्रासदायक ठरली. यात काही अपक्ष हे राजकीय पक्षांचे बंडखोर म्हणून रिंगणात आहेत. तिकिटासाठी प्रमुख दावेदार असताना काहींचा स्थानिक नेत्यांनी तिकीट न मिळू देण्यासाठी 'गेम' केला. परिणामी बहुतांश नाराज अपक्षांनी उमेदवारी दाखल करून ते निवडणूक रिंगणात आहेत. आता तर 'मैं नहीं तो, तू भी नहीं' अशीच रोखठोक भूमिका अनेक अपक्ष उमेदवारांनी घेतल्याचे चित्र आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Amravati Municipal Elections: Independent Candidates Threaten Established Parties' Prospects.

Web Summary : Amravati's municipal election sees 120 independent candidates potentially disrupting major parties' chances. History shows independents once held significant power. Disgruntled hopefuls, denied party tickets, now aim to upset established political calculations, adopting a 'if I can't win, neither can you' stance.
टॅग्स :Amravati Municipal Corporation Electionअमरावती महानगरपालिका निवडणूक २०२६Electionनिवडणूक 2026VotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगAmravatiअमरावती