शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
6
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
7
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
10
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
11
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
12
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
13
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
14
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
15
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
16
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
17
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
18
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
19
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
20
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका

घाऊक बाजारात मिरचीचा भाव ६ रु. किलो, तोडणीलाही लागतात तेवढेच; शेतकरी तोट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 21:45 IST

Amravati News यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मिरचीची लागवड केली. परंतु बाजारात हिरव्या मिरचीला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादनखर्चही निघेना, अशी स्थिती झालेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मिरचीची लागवड केली. परंतु बाजारात हिरव्या मिरचीला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादनखर्चही निघेना, अशी स्थिती झालेली आहे.

(In the wholesale market, the price of chilli is Rs. 6 Kg, as much as it takes to harvest; Farmers at a loss)

जिल्ह्यातील हिरव्या मिरचीची बाजारपेठ म्हणून राजुराबाजार प्रसिद्ध आहे. गतवर्षी मिरचीला चांगले भाव मिळाले. या हंगामात सुरुवातीला मिळालेला १५ ते १८ रुपये प्रतिकिलो भाव होते. आता मात्र, ६ ते १० रुपोच दर मिळत आहे. तोडणीचाही खर्च प्रतिकिलो ६ रुपये, बाजारात विक्रीसाठी नेण्याचा खर्च १ रुपया येतो. शेतकऱ्यांच्या हाती २ ते ३ रुपये पडत आहे. महागडी कीटकनाशके, खते व इतर उत्पादनखर्च काढल्याने सर्व काही उणे होते.सरकारने ४३ टक्के आयात कर लादल्याने १० रुपये खरेदीचा माल त्यांना खर्चसाह ६५ रुपये पडतो, असे राजुराबाजार येथील खरेदीदार सचिन आंडे यांनी सांगितले. शिवाय इंधनवाढीमुळे वाहतूकखर्च वाढला आहे. कोरोनाकाळात मिर्चीसह सर्वच भाजीपाला पिकावर संकट आले आहे. बुलडाणा जिल्ह्यात मिरची ६ ते ७ रुपये दराने व्यापाऱ्यांना मिळत असल्याने ते तिकडे वळले आहे. मोर्शी बाजारात राजुराबाजारपेक्षा कमी भाव मिळतो आहे. १५ आगस्टपासून राजुरा मार्केट सुरू झाले आहे. १० ते १५ रुपयात व्यापार सुरू आहे. १३ सप्टेंबरला १२ ते १४ रुपये भाव मिळाला.रेल्वे मालवाहतूक सुरू होणे आवश्यकराजुराबाजार मिरचीचे मोठ्ठे मार्केट आहे. यामुळे वरूड येथे रेल्वे मालवाहतूक सोय होणे वाहतूक खर्च बचतीसाठी आवश्यक आहे. आगामी काळात थेट राजुराबाजार येथूनच रेल्वे मालधक्का करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. मिरचीला ३० ते ३५ रुपये भाव मिळाल्यास उत्पादन खर्च निघतो. त्यासाठीे मिरची उत्पादकाला राजकीय पाठबळ आवश्यक आहे, असे मत शेतकरी सुनील बुरंगे यांनी व्यक्त केले.

यावर्षी बांग्लादेश सरकारने मिरचीवर आयात कर वाढविल्याने तेथील व्यापारी उतरले नाही. वाहतूक खर्चही वाढला आहे. तो विचार करून देशात इतर राज्यात माल जातो. परिणामी बाजारात चैतन्य नाही.- सचिन आंडेमिरची व्यापारी, राजुराबाजार

टॅग्स :agricultureशेती