शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

'त्यांच्या' संपूर्ण घराला वेढले आहे वेलींनी.. त्याच्या कारणामागे आहे एक परंपरागत वारसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2021 08:30 IST

Amravati News जगात विविध छंद जोपासणारे अनेक अवलिया आपण पाहिले आहेत. आपल्या गुरूंनी दिलेला आयुर्वेदाचा वारसा जपणारे एक अवलिया चांदूररेल्वे तालुक्यातील नया सावंगा येथे पाहावयास मिळतो आहे.

ठळक मुद्देगुरुच्या वारसाचे संवर्धन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: जगात विविध छंद जोपासणारे अनेक अवलिया आपण पाहिले आहेत. आपल्या गुरूंनी दिलेला आयुर्वेदाचा वारसा जपणारे एक अवलिया चांदूररेल्वे तालुक्यातील नया सावंगा येथे पाहावयास मिळतो आहे. त्यांच्या संपूर्ण घराला आयुर्वेदिक व गुणकारी वेलींनी वेढले आहे. अनेक आयुर्वेदिक वनस्पतींचे ते अत्यंत जपून संवर्धन करतात. (The whole house is surrounded by vines. There is a traditional heritage behind it)श्रीकृष्ण नारायण भलावी असे या आयुवेदाचार्यांचे नाव आहे. गुळवेल, धोत्रा, तुळस, सब्जा, शतावरी, पानवेल, लाजवंती, पांढरेभुंज, समुद्रशेष, जटाशंकर, हलजोड, श्वेत अपराजित, पर्णकुटी यांसारख्या असंख्य आयुर्वेद वनस्पती भलावी यांनी आपल्या अंगणात लावल्या व त्याचे जतन केले. त्यांच्या घरात लागलेल्या समुद्रशेष या वेलाने तर संपूर्ण घराला आच्छादन केले आहे. त्यांना त्यांच्या या छंदाविषयी विचारले असता, त्यांनी सांगितले की, त्यांचे गुरू पागलदास बाबा यांचा वारसा ते सांभाळत आहेत.अमरावती रोडवर पोहरा ते चिरोडी मार्गात पागलदास महाराज यांचे आश्रम आहे. त्यांना आयुर्वेदाचे मोठे ज्ञान होते. ते अनेक आजारांवर गुणकारी औषधे देत. त्यांच्या मृत्यूनंतर वडिलोपार्जित सेवाभावाने श्रीकृष्ण भलावी यांनी त्यांचा वारसा जपण्यासाठी या आयुर्वेदिक वनस्पतींसाठी स्वत:चे जीवन वाहिले असल्याचे त्यांनी सांगितले. उदरनिर्वाह म्हणून शेती आणि दर शनिवारी मंगळवारी ते मंदिरात येणाऱ्या रुग्णांवर आयुर्वेदिक औषधे देतात. त्यांनी त्यांच्या घराच्या आवारात अशा गुणकारी वनस्पतींचे छोटे जंगलच उभे केले. त्यांचे संपूर्ण कुटुंब या वनस्पतींचे संवर्धन करतात. माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या या वृक्षप्रेमाची प्रशंसा केली.घरातील अनेक वनस्पती या बहुगुणकारी आहेत. सात वर्षांपूर्वी महाराजांपासून प्रेरणा घेत या कार्याला सुरुवात केली. फिरताना जिथे जिथे वेगवेगळ्या वनस्पती दिसतात. तिथून त्या घेऊन मी माझ्या घरी आणून त्याचे जतन करतो. बहुगुणकारी तुळसची चारशे झाडे मी या परिसरात लावली आहेत. अजूनही माझा अभ्यास सुरू आहे.- श्रीकृष्ण भलावी, नया सावंगा, ता. चांदूर रेल्वे

टॅग्स :Jara hatkeजरा हटके