शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 05:01 IST

तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, कडक निर्बंध पाळले जात आहेत. मात्र, तालुक्यात कर्तव्य बजावणारे शासकीय तसेच खाजगी कार्यालयातील कर्मचारी दररोज अमरावतीहून ये-जा करीत असतात. सध्या अमरावती हे ‘कोरोना हब’ बनले असून, शहरभरात तसेच बहुतांश नागरी वस्त्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. अशात अमरावतीवरून अपडाऊन करणाऱ्या या कर्मचाऱ्यांमुळे जिल्हाभरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

ठळक मुद्देचांदूर बाजारात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अप-डाऊन : कोरोना येईल आटोक्यात?तहसील कार्यालयात शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : स्थानिक तहसील कार्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने येथे सर्वसामान्यांना एंट्री बंद करण्यात आली आहे. तालुका प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याची काळजी करीत हा निर्णय घेतला आहे. मात्र, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीच अद्यापही अप-डाऊन करतात. मुख्यालयी न राहणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार तरी कोण, असा प्रश्न चर्चिला जात आहे.तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, कडक निर्बंध पाळले जात आहेत. मात्र, तालुक्यात कर्तव्य बजावणारे शासकीय तसेच खाजगी कार्यालयातील कर्मचारी दररोज अमरावतीहून ये-जा करीत असतात. सध्या अमरावती हे ‘कोरोना हब’ बनले असून, शहरभरात तसेच बहुतांश नागरी वस्त्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. अशात अमरावतीवरून अपडाऊन करणाऱ्या या कर्मचाऱ्यांमुळे जिल्हाभरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.तहसील कार्यालयातील चतुर्थश्रेणी महिला कर्मचाऱ्याच्या अमरावती येथील राहत्या घराशेजारील व्यक्ती कोरोना पॉझिटिव आढळल्याने या रुग्णाच्या संसगार्मुळे सदर कर्मचारीसुद्धा पॉझिटिव्ह झाल्याचे समोर आले आहे. तसेच या महिला कर्मचाऱ्याच्या घरातील काही व्यक्तीसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामुळे स्थानिक तहसील कार्यालयात खबरदारी म्हणून सर्वसामान्य व्यक्तींना प्रवेश नाकारण्यात आला आहे. तहसील कार्यालयाचे प्रवेशद्वार पहिल्यांदाच नागरिकांसाठी बंद करण्याची वेळ आली. कार्यालयातील सदर महिला कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने संपूर्ण कार्यालयातील तसेच कृषी विभागातील कर्मचाºयांचे थ्रोट स्वॅब घेण्यात आले. तरीदेखील मुख्यालयी न राहता अमरावती शहरातून शेकडो कर्मचारी दररोज तालुक्यात कर्तव्य बजावण्यासाठी येतात. यात शासकीय कर्मचारी, बँक, शाळा-महाविद्यालयांचे कर्मचारीदेखील आहेत.कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमिवर उपविभागीय अधिकाऱ्यांनी आदेश काढून शिक्षक व अन्य सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालायी राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र चांदूर रेल्वे, राजूराबाजार व चांदूरबाजार येथील कोरोना बाधितांच्या संदर्भात कर्मचाऱ्यांचे अप-डाऊनच कारणीभूत ठरल्याचे वास्तव आहे. यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईकडे लक्ष आहे.कारवाई कागदावरचमुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशासनाने मुख्यालयाचे बंधन टाकावे, अशी मागणी नागरिकांतर्फे केली जात आहे. अप-डाऊन करून सर्वसामान्य नागरिकांच्या जिवावर उठलेल्या या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र, अद्याप ती कागदावरच आहे.रॅपिड टेस्टचा अहवाल निगेटिव्हचांदुर बाजार : स्थानिक तहसील कार्यालयात मंगळवारी दुपारी ४७ कर्मचाऱ्यांचे रॅपिड टेस्ट नमुने घेण्यात आले. यात सर्व अहवाल निगेटिव्ह आलेले आहे. ४ कर्मचाऱ्यांच थ्रोट स्वॅब घेण्यात आले असून त्यांचे अहवाल प्राप्त होईपर्यंत त्यांना होम क्वारंटाईन सुचविण्यात आले आहे. स्थानिक तहसील कार्यालयातील चतुर्थ श्रेणी महिला कर्मचारी अमरावती येथिल राहत्या घरी कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. त्यानुसार सोमवारी कार्यालयात उपस्थित असल्याने सदर कर्मचारी संपर्कात आली असल्याचा संशयावरून खबरदारी म्हणून तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी, तलाठी यांची रॅपिड चाचणी घेण्यात आली. कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याबाबत पत्र पाठवून सूचना देण्यात येत आहेत.- अभिजित जगताप, तहसीलदार, चांदूरबाजार.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTahasildarतहसीलदार