शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेहांची विटंबना रोखणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 22:56 IST

हिंदू संस्कृतीत मृत्यूपश्चात केले जाणारे विधिवत संस्कार आत्म्याच्या शांतीसाठी विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते.

ठळक मुद्देजनावरे, माणसांचे एकाच जागी दफनविधी : हिंदू स्मशानभूमिचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हिंदू संस्कृतीत मृत्यूपश्चात केले जाणारे विधिवत संस्कार आत्म्याच्या शांतीसाठी विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. परंतु हिंदू स्मशानभूमित मृतदेहांची विटंबना होत असल्यामुळे मरणानंतरही विधी संस्कार अपूर्ण राहतात. त्यामुळे मृतदेहांची वारंवार होणारी विटंबना रोखणार कोण, असा प्रश्न जनसामान्यांमध्ये उपस्थित होत आहे.महिनाभरात दोन बाळांचे पुरलेले मृतदेह उकरून काढण्यात आले आणि त्याचे नामोनिशाण अदृष्य झाल्यासारख्याच धक्कादायक प्रकार समोर आला. मानवी मृतदेह गायब होण्याचा हा सिलसिला अनेक दिवसांपासून सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे हिंदू स्मशानभूमितील एकाच परिसरात मृत जनावरे व माणसांना पुरले जातात. अनेकदा ज्या ठिकाणी जनावरे पुरले गेलेत, तीच जागा खोदून त्यात मानवी मृतदेहसुध्दा पुरल्याचे स्पष्ट झाले आहे. हिंदू स्मशानभूमितील हा प्रकार मानवाधिकार हनन करणारा आहे. राजापेठ पोलिसांनी हिंदू स्मशानभूमित होणारा विटंबनेचा प्रकार वरिष्ठ स्तरावर कळविला आहे. तेथे रोज दोन बाळांचे दफनविधी होत असल्याची माहिती संस्थेतील कर्मचाºयांनी दिली. त्यानुसार महिन्याकाठी ६० बाळांचे मृतदेह जमिनीत पुरले जात असावेत. या बाळांच्या मृतदेहापैकी किती मृतदेह उकरून काढले याचा हिशेबच कुणी ठेवणार नाही. दोन बाळांच्या नातेवाईकांनी त्यांच्या आप्तेष्टांचा मृतदेह गायब झाल्याची दखल घेऊन पोलीस तक्रार केली. मात्र, ज्यांनी मृतदेह पुरल्यानंतर पुन्हा त्या जागेवर जाऊनच पाहिले नाही त्यांच्या पुरलेल्या मृतदेहांचे काय झाले, हे जाणून घेण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही.पहिल्या घटनेवेळी पोलिसांनी हिंदू स्मशानभूमितील व्यवस्था सुधारण्यासाठी सक्त नोटीस बजावली होती. मात्र, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आणखी एका बाळाचा मृतदेह काढून नेल्याचा प्रकार घडला. आणखी किती दिवस मानवी मृतदेहांची अशी विटंबना चालणार आहे, ती रोखणार कोण, असा प्रश्न अमरावतीकरांनी उपस्थित केला आहे.नोटीसला केराची टोपलीहिंदू स्मशानभूमितील व्यवस्था सुधारण्यासंबंधी राजापेठ पोलिसांनी हिंदू स्मशान भूमीच्या विश्वस्थांना नोटीस बजावली. मानवी मृतदेहांची विटंबना होत असल्याचे पत्र राजापेठ पोलिसांनी पोलीस आयुक्त, जिल्हाधिकाºयांना पाठविले होते. मात्र, पोलिसांंच्या नोटीसची गंभीर दखल न घेता नोटीसला केराची टोपली दाखविले आहे.मग पैसे घेता कशासाठी ?हिंदू स्मशानभूमित मृतदेह पुरण्यासाठी २०० रुपये घेतले जातात. मात्र, त्यानंतरही मृतदेह पुरण्याचा खड्डा करण्यासाठी कर्मचाºयांना आगाऊ पैसे द्यावेच लागते. तीन ते पाच फुटापर्यंत खड्डा खोदून मृतदेह पुरणे आवश्यक असते. मात्र, खड्डे खोदणारे केवळ दीड फुटांचाच खड्डा खोदतात. त्यामुळे मृतदेह उकरण्याचा प्रकार घडत आहे. मग हिंदू स्मशानभूमी पैसे घेते तरी कशाला, असा सवाल आप्तजन विचारत आहेत. संस्थेने खड्डे खोदणाºयांची इत्यंभूत माहिती ठेवणे गरजेचे आहे. मात्र, तसे होत नसल्याचे आढळून आले आहे.