बांधकाम विभाग, महापालिकेचा कारभार : वाहनधारकांची अडचणवैभव बाबरेकर अमरावतीशहरातील बहुतांश मार्गांवर विविध कारणांनी खोदकाम केले जाते. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा महापालिका प्रशासनाकडून परवानगी घ्यावीच लागते. मात्र, आवश्यक ते काम झाल्यानंतर केलेले खड्डे व्यवस्थित बुजविले जात नाही. परिणामी रस्त्यांची पुरती वाट लागते. त्यामुळे खोदलेल्या रस्त्यांची डागडुजी कोणी करायची? ही जबाबदारी कुणाची, हा प्रश्नच आहे. हल्ली शहरातील अनेक रस्त्यांवर या-ना त्या कारणाने खोदून ठेवलेल्या रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे वाहनधारकांचे हाल होताहेत. स्मार्ट सिटीच्या वैभवाला ही बाब नक्कीच गालबोट लावणारी आहे. अमरावती-बडनेरा मार्गावर अनेक दिवसांपासून काही ना काही कामे सुरु आहेत. कधी पाईपलाईन साठी, कधी टॉवरलाईनसाठी, कधी अंडरग्राऊंड केबलसाठी तर कधी टाकलेल्या केबलच्या दुरूस्तीसाठी रस्ता खोदला जातो. अमरावती-बडनेरा हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहे. कामासाठी रस्ता खोदल्यानंतर तो दुरूस्त करण्याची तसदी बांधकाम विभाग घेत नाही. त्यामुळे मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागतोे. अनेकदा अपघातही घडतात. शनिवारी दसरा मैदानासमोरील रस्त्याच्या खालून गेलेली जुनी पाईपलाइन बदलण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केले. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्तखड्डा करण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा महापालिकेची परवानगी घेऊन . पैसे भरावे लागतात. खोदकाम झाल्यानंतर त्या जागेची पाहणी अधिकाऱ्यांना करावी लागते. मात्र, तसे होत नाही. त्यामुळे अनेक दिवसांपर्यंत रस्त्याची दुर्दशा होऊन नागरिकांना त्याचा मन:स्ताप सहन करावा लागतो. खोदकामाची परवानगी दिल्यावर संबंधित व्यक्ति अथवा विभाग खोदकाम करून खड्डे तात्पुरते बुजवितात. परवानगीसाठी घेतल्या जाणाऱ्या शुल्कातून खड्डयावर डांबरिकरण किंवा क्राँक्रिटीकरण केले जाते. मात्र, काही ठिकाणी खड्डे व्यवस्थित बुजविण्यात आले नसल्याच्या तक्रारी आहेत.- जीवन सदार,अतिरिक्त कार्यकारी अभियंता, नगररचना विभाग, महापालिका.मजीप्राने परवानगी घेऊन खोदकाम केले आहे की नाही हे बघावे लागेल.त्यांनी खोदकामानंतर ते खड्डे व्यवस्थित बुजवायला पाहिजे होते. बांधकाम विभागाकडून लवकरच रस्ता व्यवस्थीत करण्यात येईल. - एस. आर. जाधव,कार्यकारी अंभियता, सार्वजनिक बांधकाम विभाग.
खोदकाम केलेल्या रस्त्यांची दुरूस्ती करणार कोण ?
By admin | Updated: December 14, 2015 00:08 IST