अमरावती : विनाक्रमांकाच्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारुन शहर वाहतूक शाखेने चांगला पायंडा घातला आहे. रस्त्यावरुन विनाक्रमांकाची वाहने धावणे कमी झाले असले तरी अल्पवयीनांच्या ‘धूमस्टाईल’वर कुणाचाही अंकुश नाही. नववी-दहावीच्या मुलांच्या हाती बिनधास्तपणे गिअरबाईक दिली जाते. मग, वेगाचे वेड असलेली ही मुले ‘स्टाईल’ मारण्याकरिता समवयस्क मित्रांना ‘लिफ्ट’ देतात. वाहन परवाना नसताना ट्रीपल आणि प्रसंगी चार जणांना बसवून दुचाकी पिटाळतात. यातूनच अपघात घडतात. अल्पवयीन वाहनधारकांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी वाहतूक विभागासोबत शाळा-पालकांचीही आहे. मात्र, सध्याची स्थिती पाहता कुणीच आपली जबाबदारी पार पाडताना दिसत नाही. शिवाजीनगर परिसरातील श्री गणेशदास राठी विद्यालयाजवळ शनिवार ३० जानेवारीला सकाळी ९ ते १० वाजताच्या दरम्यान लोकमतच्या छायाचित्रकाराने टिपलेली ही अल्पवयीन वाहनधारकांची छायाचित्रे. ती अतिशय बोलकी आहेत.
यांच्यावर अंकुश कुणाचा ?
By admin | Updated: February 1, 2016 00:09 IST