शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
6
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
7
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
8
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
9
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
10
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
11
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
12
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
13
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
14
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
15
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
16
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
17
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
18
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
19
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर

कुणाला फुलकोबी, कुणाला अद्रक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 5:00 AM

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय, राज्य पातळीवरील विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरत आहेत. अपक्षांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुक्त चिन्हांची संख्यादेखील आता १९७ पर्यंत पोहचली आहे. अपक्ष उमेदवारांसाठी फुलकोबी, सिमला मिरची, अद्रक, आईस्क्रीम, पाव, बे्रडटोस्ट, कलिंगड आदी प्रकारचे गमतीशीर मुक्त चिन्हे आयोगाने अपक्ष उमेदवारांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.

ठळक मुद्देअपक्षांसाठी १९७ मुक्त चिन्हे : संगणक, लॅपटॉप, अ‍ॅन्टीनाचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती/परतवाडा : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय, राज्य पातळीवरील विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरत आहेत. अपक्षांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुक्त चिन्हांची संख्यादेखील आता १९७ पर्यंत पोहचली आहे. अपक्ष उमेदवारांसाठी फुलकोबी, सिमला मिरची, अद्रक, आईस्क्रीम, पाव, बे्रडटोस्ट, कलिंगड आदी प्रकारचे गमतीशीर मुक्त चिन्हे आयोगाने अपक्ष उमेदवारांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.विधानसभेच्या २८८ जागांसाठी निवडणूक होत आहे. जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. ७ आॅक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. याच दिवशी निवडणुकीतील उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, बहुजन समाज पार्टी व तृणमूल काँग्रेस हे सात राष्ट्रीय पक्ष आहेत. शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन पक्ष राज्य पातळीवरील पक्ष आहेत. राष्ट्रीय व राज्य पातळीवरील या सर्व पक्षांना निवडणूक आयोगाने चिन्ह दिले आहेत. या पक्षांच्यावतीने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना त्या-त्या पक्षांचे चिन्ह प्रदान केले जातील. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारांची वाढती संख्या लक्षात घेऊन भारत निवडणूक आयोगाने १९७ मुक्त चिन्हे उपलब्ध करून दिली आहेत. पाव बिस्कीट, केक, ब्रेडटोस्ट अशा बेकरी वस्तुंचा देखील चिन्हासाठी वापर केला आहे. चपला बूट, मोजे अशी चिन्हदेखील आयोगाने उपलब्ध करून दिली आहेत.आईस्क्रीम द्राक्षांचाही समावेशनरसाळे, तंबू, हेल्मेट, लायटर एसी, सायकल पंप, कॅमेरा, कोट, दरवाजाची घंटी, नरसाळे, हेलिकॉप्टर, कडी, भुईमूग, करणी थापी, सेफ्टी पिन टाचणी, स्पॅनर पाना, तंबू, टायर्स, लोकर व सुई, कपाट, दुर्बीण, कॅन, नारळाची बाग, दरवाजाचे हँडल, ऊस शेतकरी, हेल्मेट, पत्रपेटी, नासपती, जेवणाचे ताट, करवत, स्टेप्लर, भालाफेक, व्हॅक्यूम क्लिनर, सफरचंद, बिस्किट, सिमला मिरची, कलर ट्रे आणि ब्रश, ड्रील मशीन, गॅस सिलिंडर, हॉकी आणि बॉल, लायटर, मटार, प्लेट स्टँड, शाळेचे दप्तर, स्टेथोस्कोप, टीलर, व्हायोलिन, आॅटोरिक्षा, फळा, गालिचा, संगणक, डम्बेल्स, गॅस शेगडी, वाळूचे घड्याळ, लुडो, पेनड्राइव्ह, हंडी, कात्री, स्टुल, टॉफीज, चालण्याची काठी, बेबी वॉकर, मनुष्य व शीडयुक्त नाव, कॅरम बोर्ड, संगणक माऊस, कानातील रिंगा, भेटवस्तू, आइस्क्रीम, जेवणाचा डबा, पेनाची निब ७ किरणांसह, कुकर, शिवणयंत्र, स्टॅम्प्स, चिमटा, भिंतीची खुंटी, फुगा, पेटी, फुलकोबी, खाट, विजेचा खांब, अद्रक, पाणी गरम करण्याचा रॉड, तुतारी वाजवणारा माणूस, पेन स्टँड, पंचिंग मशीन, जहाज, झोपाळा, टूथब्रश, पाकीट, बांगड्या, पाव, सीसीटीव्ही कॅमेरा, क्रेन, लिफाफा, काचेचा पेला, इस्त्री, काडेपेटी, पेन्सिलचा डबा, रेझर, बूट, स्विच बोर्ड, टूथ पेस्ट, अक्रोड, फळांची टोपली, ब्रेड आदी.

टॅग्स :Electionनिवडणूक