शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत प्रथमच आढळला काळा सूरय पक्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 11:45 IST

वन्यजीव छायाचित्रकार मीनाक्षी राजपूत यांनी शहरालगतच्या छत्री तलावावर १६ मे रोजी पांढऱ्या पंखांच्या काळ्या सूरय पक्ष्याचे छायाचित्र टिपून महत्त्वपूर्ण नोंद घेतली आहे. या पक्ष्याचे अमरावती जिल्ह्यातील हे प्रथम दर्शन ठरले आहे.

ठळक मुद्देछत्री तलावावर टिपले छायाचित्र परतीच्या प्रवासात मार्ग बदलल्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कवैभव बाबरेकर/अमरावती: वन्यजीव छायाचित्रकार मीनाक्षी राजपूत यांनी शहरालगतच्या छत्री तलावावर १६ मे रोजी पांढऱ्या पंखांच्या काळ्या सूरय पक्ष्याचे छायाचित्र टिपून महत्त्वपूर्ण नोंद घेतली आहे. या पक्ष्याचे अमरावती जिल्ह्यातील हे प्रथम दर्शन ठरले आहे.सामान्यपणे तलावाच्या काठी ८ ते १० च्या संख्येत आढळणाऱ्या पक्ष्यांच्या थव्यामध्ये एक वेगळा आणि काळ्या रंगाचा सूरय पक्षी दिसताच त्याचे छायाचित्र काढून ओळख पटवण्याकरिता त्यांनी ते मनोज बिंड आणि राहुल गुप्ता यांना पाठवले. प्रत्यक्ष तलावावर जाऊन सदर पक्षी पांढऱ्या पंखांचा काळा सूरय असल्याची खात्री करून घेण्यात आली. या पक्ष्याचे इंग्रजी नाव 'व्हाइट विंग टर्न' असे आहे.युरोप, आॅस्ट्रेलिया आणि मध्य आशियात तो आढळून येत असला तरी भारतात तुरळक प्रमाणात हिवाळ्यात स्थलांतर करून येतो. गोड्या पाण्याचे मोठे तलाव, जलाशय आणि समुद्रकिनाऱ्यावर सुद्धा तो आढळतो. साधारणपणे २० ते २३ से.मी. लांबीच्या या पक्ष्याची इतर नदी सूरय पक्ष्यांमधून वेगळी ओळख पटवणे एरवी जरा कठीण असले तरी विणीच्या हंगामात शेपटी आणि पंख वगळता हा पक्षी पूर्णपणे काळा रंग धारण करतो. पाय मात्र लालसर असतात. या काळ्या रंगावर त्याचे रूपेरी पांढरे पंख खुलून दिसतात. अन्न मिळविण्याकरिता इतर सूरय पक्ष्यांप्रमाणे हा पाण्यात फारच कमी वेळा सूर मारतो. पाण्यावर समांतर उडून छोटे कीटक आणि लहान मासे अलगद टिपणे हे याचे खास वैशिष्ट्य आहे.यावर्षी मार्च महिन्यात यवतमाळ येथे या पक्ष्याची नोंद घेतली गेल्याने अमरावतीकर पक्षीमित्र, वन्यजीव छायाचित्रकार आणि अभ्यासक यांची उत्सुकता ताणली गेली होती. कडक उन्हामुळे तलावात उपलब्ध पाण्याचे आणि पक्ष्यांच्या खाद्याचे प्रमाण अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्याने असे सहसा आढळून न येणारे पक्षी परतीच्या प्रवासात नियोजित मार्ग सोडून इतरत्र मुक्कामाला थांबत असावे आणि त्यामुळे यावर्षी अशा दुर्मीळ नोंदींचे प्रमाण वाढले असावे, असा निष्कर्ष काढला जात आहे.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य