शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पांढरे सोने झाले काळे; दर्यापूर तालुक्यात पाण्याअभावी कपाशीचे पीक नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 12:00 IST

दर्यापूर तालुक्यात सन २०१७-१८ मध्ये कपाशीचे उत्पादन अंदाजापेक्षा फारच कमी आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दर्यापूर तालुक्यात सन २०१७-१८ मध्ये कपाशीचे उत्पादन अंदाजापेक्षा फारच कमी आले आहे. शेतकऱ्यांनी सुरुवातीला हवामान खात्याच्या अंदाजानुसार कपाशीची पेरणी जास्त प्रमाणात केली. तालुक्यात २६ हजार ६७५ हेक्टरमध्ये कपाशीची पेरणी करण्यात आली आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना हेक्टरी दहा क्विंटल कापूस व्हायचा, तेथे पाच क्विंटलपर्यंत उत्पादन घसरले. शेतकऱ्यांनी हेक्टरी कपाशीवर ५० हजार रुपये खर्च केला आहे; मात्र कापसाच्या रूपाने त्यांना फक्त २५ ते ३० हजार रुपये हेक्टरी उत्पन्न निघणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ठरलेले आहे.कपाशीचे पीक हे शेतकऱ्यांमध्ये पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. मात्र, एका पाण्यामुळे संपूर्ण पिक नष्ट झाल्याचे तालुक्यातील सद्यस्थिती आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांना हेक्टरी ४० क्विंटल कापूस झाला होता. यावर्षी मात्र शेतकऱ्यांनी दोन वेचे काढल्यानंतर आपल्या शेतातील पिकाची उलंगवाडी करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.यावर्षी जमिनीतील ओलावा घटल्यामुळे हिवाळ्यापर्यंत कपाशीने तग धरला नाही. त्यामुळे थंडीची कपाशीची बोंडे लागणार नाहीत, हे नक्की झाले आहे. दरवर्षीपेक्षा या वर्षामध्ये शेतकºयांना कपाशीचे पीक हे ३० टक्के होणार असल्याचे आमच्या सर्वेक्षणानुसार आढळून आले आहे.- राजू तराळ, कृषी अधिकारी (प्रभारी), दर्यापूर

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस