शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

पांढऱ्या सोन्याला पहिल्यांदा झळाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2022 05:00 IST

लांग स्टेपलच्या कापसाला यंदा ६,०२५ रुपये क्विंटल हमी भाव जाहीर करण्यात आलेला आहे; परंतु हंगामाचे सुरुवातीपासूनच कापसाला हमीभावपेक्षा जास्त दर मिळत आहे. यंदा हलक्या जमिनीच्या भागात दोन वेच्यात उलंगवाडी होत आहे तर भारी जमिनीमध्ये अतिपावसाने बोंडसडचे संकट उद्भवले आहे. याशिवाय बोंड फुटत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे काही शेतकरी कपाशी काढून हरभरा, गव्हाची लागवड करीत असल्याचे दिसून येते. एकूणच कापसाचे पीक चांगले दिसतानाही उत्पादनात कमी येत असल्याचे वास्तव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा कापसाच्या उत्पादनात कमी आलेली असतानाच दरात मात्र, झळाळी आलेली आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. रुईची दरवाढ होत असल्याने यंदा कापूस दहा हजार पार करण्याची शक्यता आहे. दरवाढीच्या आशेमुळे शेतकरीदेखील कापसाची साठवणूक करीत असल्याचे दिसून येते.लांग स्टेपलच्या कापसाला यंदा ६,०२५ रुपये क्विंटल हमी भाव जाहीर करण्यात आलेला आहे; परंतु हंगामाचे सुरुवातीपासूनच कापसाला हमीभावपेक्षा जास्त दर मिळत आहे. यंदा हलक्या जमिनीच्या भागात दोन वेच्यात उलंगवाडी होत आहे तर भारी जमिनीमध्ये अतिपावसाने बोंडसडचे संकट उद्भवले आहे. याशिवाय बोंड फुटत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे काही शेतकरी कपाशी काढून हरभरा, गव्हाची लागवड करीत असल्याचे दिसून येते. एकूणच कापसाचे पीक चांगले दिसतानाही उत्पादनात कमी येत असल्याचे वास्तव आहे. दिवाळीपश्चात कपासाची भाववाढ सुरू झाली. आठ हजारांवर महिनाभर स्थिरावल्यानंतर आता भाव नऊ हजारांवर आलेले आहे. खासगीमध्ये दरवाढ होत असल्याने पणन महासंघाद्वारा यंदा खरेदी होणार नाही, ही बाब आता स्पष्ट झाली आहे. कोरोना संसर्ग माघारल्यानंतर कापसाच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कापूस पणन महामंडळ (सीसीआय) लादेखील यंदाच्या हंगामात खासगी बाजारात उतरून  कापूस खरेदी करण्याची गरज भासणार नाही, असेच एकूण चित्र आहे.

खेडा खरेदीत शेतकऱ्यांची लूटकाही शेतकरी गावातील व्यापाऱ्यांना कापसाची विक्री करीत आहेत. यामध्ये भाव कमी व शेतकऱ्यांची लूट होत असल्याचे दिसून येते. अनेकदा हे व्यापारी अडचणीच्या वेळी मदत करतात व त्याबदल्यात कापसाची खरेदी करतात. गावपातळीवर वजनमापातही हेराफेरी होते.

कापसाचे तालुकानिहाय क्षेत्रजिल्ह्यात यंदा २.२७ लाख हेक्टरमध्ये कपाशीचे पेरणीक्षेत्र आहे. यामध्ये धारणी तालुक्यात ९,३०० हेक्टर, चिखलदरा २,३४७, अमरावती १३,६४०, भातकुली १०,९४३, नांदगाव खंडेश्वर ६,०७६, चांदूर रेल्वे ८,२८५, तिवसा १६,६७८, मोर्शी १६,६७८, वरुड २७,८६४, दर्यापूर ३२,१२०, अंजनगाव सुर्जी १६,४२०, अचलपूर १७,८७१, चांदूरबाजार १७,२६६ व धामणगाव तालुक्यात २१,०८७ हेक्टर क्षेत्र आहे.

राज्यात कापसाच्या उत्पादनात घट झाली आहे. मागणी वाढल्याने कापसाचे भाव वाढले आहेत. शेतकऱ्यांची होल्डिंग कॅपेसिटी वाढली आहे. आणखीन ४०० ते ५०० रुपयांपर्यंत दरवाढ अपेक्षित आहे.- नीलेश लोहाणा, कॉटन ब्रोकर 

 

टॅग्स :cottonकापूस