अमरावती : जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल मनोरूग्ण महिलेच्या त्रासामुळे येथील परिचारिकांच्या नाकीनऊ आले आहे. या महिलेचीही अवहेलना होत आहे. या महिलेला रुग्णालयात करणारे तिवसा पोलीस मात्र महिलेच्या पुनर्वसनाबाबत गंभीर नसल्याने महिलेचे हाल होत आहेत. ही महिला वॉर्ड क्रमांक १४ मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दाखल आहे. मनोरूग्ण असल्याने ती सतत रूग्णालयाच्या आवारात फिरत असते. अंगावरील कपड्यांचे भानही तिला नसते. त्यामुळे समाजकंटकांच्या नजरा तिच्याकडे विकृतपणे वळतात. विमनस्क अवस्थेत महिलेद्वारे स्वत:लाच इजा करून घेण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे तिचा सांभाळ करताना येथील परिचारिका हैराण झाल्या आहेत. त्या महिलेचा मानसिक उपचार होऊन पुनर्वसन व्हावे, याकरिता इर्विन प्रशासनाकडून तिवसा पोलिसांसोबत अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आले. मात्र अद्यापर्यंत पोलिसांनी कोणतीच हालचाल न केल्याने तिचा त्रास सुरूच आहे. पोलिसांनी या महिलेची अवहेलना थांबवावी. यासाठी रुग्णालयात धावपळ सुरू आहे.
‘त्या’ मनोरुग्ण महिलेची विटंबना कुठवर?
By admin | Updated: March 15, 2015 00:40 IST