शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

मध्य प्रदेशच्या सीमेवर चेकपोस्ट गेले कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 05:00 IST

मध्यप्रदेशातून अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रेती तस्करी करून रेतीची वाहतूक आणि साठेबाजी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यामुळे वरूड तालुक्यासह जिल्ह्यातील रेतीघाट लिलाव झालेच नाहीत. उलट या रेतीघाटातील रेतीसुद्धा चोरीला जात असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. या प्रकाराला आळा  घालण्याकरिता मध्य प्रदेशातील रेती वाहतूक तसेच साठवणुकीस प्रतिबंध घालण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात १६ नोव्हेंबर रोजी बैठक पार पडली.

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : अमरावती जिल्ह्यात मध्य प्रदेशातून रेती तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने रेतीघाट लिलावावर परिणाम जाणवत आहे. परराज्यातून येणारी रेती वाहतूक आणि साठवणुकीवर प्रतिबंध लावण्याकरिता अप्पर जिल्हाधिकारी अमरावती यांनी ३० नोव्हेंबर रोजी आदेश काढून १ डिसेंबरपासून त्रिसदस्यीय चेकपोस्ट स्थापन करण्यासंदर्भात आदेश दिले. परंतु, चेकपोस्ट कुठेही स्थापन केलेले नसल्याने वरूड तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर मध्यप्रदेशातून रेती तस्करी सुरू आहे. ती रोखण्यासाठी पथके तयार केल्याचे तहसीलदार सांगतात.  मध्यप्रदेशातून अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रेती तस्करी करून रेतीची वाहतूक आणि साठेबाजी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यामुळे वरूड तालुक्यासह जिल्ह्यातील रेतीघाट लिलाव झालेच नाहीत. उलट या रेतीघाटातील रेतीसुद्धा चोरीला जात असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. या प्रकाराला आळा  घालण्याकरिता मध्य प्रदेशातील रेती वाहतूक तसेच साठवणुकीस प्रतिबंध घालण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात १६ नोव्हेंबर रोजी बैठक पार पडली. मध्यप्रदेशातील रेती वाहतुकीवर प्रतिबंध घालण्याच्या अनुषंगाने अप्पर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी यांनी ३० नोव्हेंबरला आदेश काढून धारणी, अचलपूर, चांदूर बाजार, वरूड, मोर्शी आणि तिवसा तालुक्यातील सीमेवर चेकपोस्ट स्थापन करण्यात येऊन पथकप्रमुख म्हणून नायब तहसीलदारांना नेमण्याचे तसेच यामध्ये महसूल, पोलीस आणि परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्याचे आदेश आहेत. तालुक्यामध्ये सीमावर्ती भागातील चेकपोस्टवरच तपासणी मोहीम राबवून यामध्ये साप्ताहिक अहवाल दर शुक्रवारी तहसीलदारांनी उपविभागीय अधिकारी यांना सादर करावा, असेही आदेश आहेत. इतर राज्यासह मध्यप्रदेशातून येणाऱ्या रेती, वाळू साठवणुकीच्या जागेवर जागामालक आणि ट्रकमालक यांच्यावर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ४८ मधील पोटकलम ८(१)व ८(२) नुसार यथोचित कारवाई पोलीस व परिवहन विभागास कळविण्याचे आदेश प्राप्त झालेले आहेत.

एसडीपीओ उतरले रस्त्यावर१ डिसेंबर रोजी निघालेल्या आदेशावर वरूड तालुक्यात कोणतीही कारवाई झाली नसल्याने अखेर उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी बुधवारी पहाटे गस्त घालून ओव्हरलोड रेतीचे चार टिप्पर जप्त केले. यामुळे रेती तस्करांमध्ये खळबळ माजली आहे.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीsandवाळू