शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

संप कधी मिटणार, एसटी कधी येणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 05:00 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात शिक्षणासाठी येण्यासाठी एसटी महामंडळाची पास मिळतो. त्यामुळे कमी दरात विद्यार्थ्यांना पास मिळत असल्याने शाळेसाठी हे सोयीचे होते. परंतु एसटी बंद असल्याने अशा विद्यार्थ्यांना खासगी वाहनांशिवाय पर्याय उरलेला नाही. खासगी वाहनांचा वेळेचा कसलाही भरोसा नसल्याने शाळेतून घरी जायला वेळ होत आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी दळणवळणाचे साधन असलेल्या एसटीला सध्या ग्रहण लागले आहे. एसटीचा संप मिटून  लालपरी ग्रामीण भागात कधी सुरू होणार याची, चर्चा ऐकावयास मिळत आहे.गत तीन महिने एसटी महामंडळातील कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी संपावर ठाम आहेत.  परंतु शासन पातळीवरून कर्मचाऱ्यांच्या संपावर अजूनही काही तोडगा न निघाल्याने संपत सुरूच आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होत आहे. जिल्ह्यातील आगारातून लांबपल्ल्याच्या एसटी बसेस बंद असल्याने अनेक बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांना नाईलाजास्तव खासगी वाहनांचा पर्याय निवडावा लागत आहे. यात  आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. ग्रामीण भागातील जनतेसाठी एसटीची सेवा ही महत्त्वाची आहे. अनेक शेतकरी,  शाळेतील विद्यार्थ्यांना ही सेवा अत्यावश्यक आहे. कारण प्रत्येक गावात एसटीची सेवा अनेक वर्षांपासून सुरू आहे. अनेक फेऱ्या तोट्यात चालत असताना लालपरी ग्रामीण भागात सेवा देत होती. त्यामुळे सर्वांनाच ही लालपरी आपली वाटते. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने आता सर्व शाळा महाविद्यालय सुरू झालेली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात शिक्षणासाठी येण्यासाठी एसटी महामंडळाची पास मिळतो. त्यामुळे कमी दरात विद्यार्थ्यांना पास मिळत असल्याने शाळेसाठी हे सोयीचे होते. परंतु एसटी बंद असल्याने अशा विद्यार्थ्यांना खासगी वाहनांशिवाय पर्याय उरलेला नाही. खासगी वाहनांचा वेळेचा कसलाही भरोसा नसल्याने शाळेतून घरी जायला वेळ होत आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत आहे. एसटीची सेवा बंद असल्याने त्याचा थेट परिणाम अनेक गावातील शहरातील बाजारपेठांवर झाला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचे शहरात येण्याचे प्रमाण फारच कमी झाले आहे. अगदी महत्त्वाच्या कामासाठी किंवा दवाखान्यातील उपचारासाठी ग्रामीण भागातील नागरिक शहरात येत आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील उलाढाल काही प्रमाणात मंदावली आहे. त्यामुळे हा संप कधी मिटणार व आपल्या गावात कधी लालपरी येण्याची प्रतीक्षा ग्रामीण भागातील प्रवाशांना लागली आहे.

खासगी वाहनधारकांकडून लूटएसटीअभावी ग्रामीण भागातून शहरात येण्यासाठी नागरिकांचे, शाळेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.  एसटीचा संप सुरू असल्याने खासगी वाहनाने ग्रामीण भागातील लोकांना पर्याय उरला आहे. परिणामी  अधिक पैसे देऊन प्रवास करावा लागत आहेत.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप