शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालये वार्षिक गुणवत्ता हमी अहवाल विद्यापीठांना केव्हा पाठविणार?

By गणेश वासनिक | Updated: February 10, 2024 16:53 IST

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा २०१६ मधील कलम ९५ च्या तरतुदीनुसार सर्व संलग्नित महाविद्यालये, संस्थांना वार्षिक गुणवत्ता हमी अहवालाची प्रत विद्यापीठाकडे पाठविणे क्रमप्राप्त आहे.

अमरावती: विद्यापीठ संलग्नित महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांना दरवर्षी वार्षिक गुणवत्ता हमी अहवाल (एक्यूएआर) पाठविणे अनिवार्य आहे. मात्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित ४०५ पैकी केवळ ५० महाविद्यालयांनीच एक्यूएआर विद्यापीठाकडे पाठविणेआहे. परिणामी विद्यापीठाच्या आय.क्यू.ए.सी. विभागाने वार्षिक गुणवत्ता हमी अहवालाची छायांकित प्रत पाठविण्याबाबत महाविद्यालयांना नोटीस बजावली आहे.

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा २०१६ मधील कलम ९५ च्या तरतुदीनुसार सर्व संलग्नित महाविद्यालये, संस्थांना वार्षिक गुणवत्ता हमी अहवालाची प्रत विद्यापीठाकडे पाठविणे क्रमप्राप्त आहे. तसेच व्यावस्थापन परिषदेच्या प्राप्त निर्देशानुसार महाविद्यालयांनी एक्यूएआर बंगळुरू येथे नॅक कार्यालयाकडे सादर केल्यानंतर तीन महिन्याच्या आत विद्यापीठाकडे सादर करणे आवश्यक आहे. परंतु अमरावती विद्यापीठाशी संलग्नित ४०५ महाविद्यालये असून त्यापैकी ३८० महाविद्यालये ‘नॅक’मध्ये समाविष्ट आहेत. असे असताना आतापर्यंत केवळ ५० महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे एक्यूएआर सादर केले आहे. त्यामुळे उच्च शिक्षणात नियमावली, कायद्याची कशी वाट लावली जात आहे, हे दिसून येते. अनुदानित महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांना यूजीसीकडून अनुदान प्राप्त होते. मात्र, यूजीसीच्या नियमांची अंमलबजावणी करण्यात ढकलगाडी का? असा सवाल उपस्थित होत आहे.महाविद्यालये अथवा शैक्षणिक संस्था या दरवर्षी ‘नॅक’कडे एक्यूएआर पाठवितात. त्याच वार्षिक गुणवत्ता हमी अहवालाची एक प्रत विद्यापीठाकडे सादर करणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र विद्यापीठ कायदा २०१६ मधील कलम ९५ मध्ये तशी तरतूद आहे. त्यानुसारएक्यूएआर पाठविणेसाठी प्राचार्य, संचालकांना नोटीसद्वारे अवगत केले आहे.- डॉ. संदीप वाघुळे, संचालक, आय. क्यू.ए.सी. अमरावती विद्यापीठ.

टॅग्स :Amravatiअमरावती