शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

अनुसूचित क्षेत्रातील 'नगरपंचायतीसाठी' विधेयक केव्हा आणणार? ट्रायबल फोरमचा सवाल

By गणेश वासनिक | Published: September 14, 2023 5:53 PM

पंतप्रधानांना पत्र : संसदेचे विशेष अधिवेशन १८ पासून

अमरावती : अनुसूचित क्षेत्रात मोडणाऱ्या नगरपंचायती व नगरपरिषदेच्या कारभाराबाबत अद्यापपर्यंत संसदेने कायदा केलेला नाही. आता संसदेचे विशेष अधिवेशन १८ ते २२ सप्टेंबर या दरम्यान होत असून या अधिवेशनात नगरपंचायती व नगरपरिषद संबंधी विधेयक आणणार का? असा प्रश्न उपस्थित करीत संसदेने अनुसूचित क्षेत्रातील नगरपंचायतीसाठी कायदा करावा, अशी मागणी 'ट्रायबल फोरम' या संघटनेने केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविण्यात आले आहे. 

संसदेने अनुसूचित क्षेत्रातील नगरपंचायतीसाठी कायदा केलेला नसतानाही महाराष्ट्र सरकारने घटनेतील तरतुदींचे उल्लंघन करुन अनुसूचित क्षेत्रात नगरपंचायती व नगरपरिषदा स्थापन केल्या आहेत. राज्यात गावांची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन शासनाने अस्तित्वात असलेल्या अनेक ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा दिल्याचे पत्रात नमूद आहे. आदिवासीबहुल लोकसंख्या असलेले अनुसूचित क्षेत्र, पेसा क्षेत्र म्हणून ओळखले जातात. या क्षेत्रासाठी राज्य घटनेच्या पाचव्या अनुसूचित विशेष तरतुदी आहेत. त्यामुळे राज्यघटनेच्या अनुच्छेद २४३ ‘य’ ‘ग’ नुसार नगरपरिषद संबंधी राज्यघटनेच्या भाग नऊ- क मधील अनुच्छेद २४३ ‘थ’ ते अनुच्छेद २४३ ‘य’ ‘ख’ मधील तरतुदी पाचव्या अनुसूचित येणाऱ्या अनुसूचित क्षेत्रांना लागू होत नाही. त्यामुळे अनुसूचित क्षेत्रात तयार करण्यात आलेल्या नगरपंचायती बेकायदेशीर आहे. 

अनुसूचित क्षेत्रातील नगरपरिषद संबंधी २००१ साली तयार केलेल्या कायद्याचा मसूदा २२ वर्षे होऊनही संसदेने पारित केलेला नाही. असे असताना राज्यसरकारने अनुसूचित क्षेत्रात नगरपंचायती गठीत केलेल्या आहेत. तेथे राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका घेऊन बेकायदेशीर कारभार सुरु केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

पेसातील नगरपंचायतीचे नगराध्यक्ष गैरआदिवासी 

नगरपंचायती        नगराध्यक्ष१) वाडा -     खुला प्रवर्ग महिला२) एटापल्ली -    खुला प्रवर्ग महिला३) सिरोंचा -    खुला प्रवर्ग महिला४) कोरची -    खुला प्रवर्ग महिला५) धारणी -    खुला प्रवर्ग महिला६) कुरखेडा -   खुला प्रवर्ग महिला७) पेठ -       खुला प्रवर्ग(सर्वसाधारण)८) भामरागड-   खुला प्रवर्ग(सर्वसाधारण)९)सुरगाणा-     खुला प्रवर्ग(सर्वसाधारण)१०)धडगाव-   खुला प्रवर्ग( सर्वसाधारण)११)तलासरी-   खुला प्रवर्ग( सर्वसाधारण)१२)मोखाडा-   खुला प्रवर्ग( सर्वसाधारण)१३)विक्रमगड-   खुला प्रवर्ग( सर्वसाधारण)

आदिवासी खासदारांचे घटनात्मक असलेल्या अनुसूचित क्षेत्रांकडे सातत्याने दुर्लक्ष झाले आहे. आता तरी केंद्र सरकारने अनुसूचित क्षेत्रातील नगरपंचायती व नगरपरिषदासाठी कायदा करावा आणि आदिवासी समाजाला त्यांचे घटनात्मक अधिकार प्रदान करावे.

- सुंदरलाल उईके, अध्यक्ष ट्रायबल फोरम, अमरावती

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाAmravatiअमरावतीGovernmentसरकार