शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आदिवासींसाठी स्वतंत्र आयोग स्थापन केव्हा? सरकारला पडला विसर

By गणेश वासनिक | Updated: July 15, 2024 13:42 IST

Amravati : जनजाती सल्लागार परिषदेत मंजुरी; नऊ महिने लोटूनही कार्यवाही शून्य, आदिवासी विकास मंत्री लक्ष देतील का

गणेश वासनिक

अमरावती: केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील आदिवासी समाजाचे प्रश्न व समस्यांचा आवाका लक्षात घेता राज्य सरकारने ११ ऑक्टोबर २०२३ रोजी जनजाती सल्लागार परिषदेच्या ५१ व्या बैठकीत अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्यास मान्यता दिली. परंतु गत नऊ महिन्यांपासून आजपर्यंत आयोगाची स्थापना करून कार्यान्वित करण्यात आले नाही. त्यामुळे आदिवासींबाबत सरकारला विसर तर पडला नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे.

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३३८ नुसार केंद्रात पूर्वी राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोग होता. भारत सरकारने ८९ वी घटना दुरुस्ती करून अनुसूचित जाती व जमातींसाठी केंद्रात दोन स्वतंत्र आयोग निर्माण केले. याच धर्तीवर राज्यातही स्वतंत्र आयोग स्थापन करण्यात यावा, अशी मागणी ट्रायबल फोरम, ट्रायबल वुमेन्स फोरम या संघटनांनी सरकारकडे केली होती. पण अद्यापही आयोग स्थापन करण्याची प्रक्रिया लाल फितीत अडकून पडलेली आहे. परिणामी आदिवासींनी कोणाकडे न्याय मागायचा? असा प्रश्न राज्यातील आदिवासी जनतेपुढे निर्माण झाला आहे.

"राज्यात अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र आयोग स्थापन झाल्यास आदिवासींचे प्रश्न व समस्यांचे, होणाऱ्या अन्याय अत्याचारांचे स्वतंत्रपणे निरसन होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आदिवासी समाजबांधवांची आहे. त्यामुळे लवकरात लवकर अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करून आदिवासींना न्याय मिळावा."- सुरेखा उईके, जिल्हाध्यक्ष, ट्रायबल वुमेन्स फोरम अमरावती

 

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाAmravatiअमरावती