शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते केव्हा घेणार मोकळा श्वास?

By admin | Updated: January 19, 2015 23:56 IST

अमरावतीला ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल करीत आहे. मात्र, अतिक्रमणाने गुदमरलेले रस्ते मोकळा श्वास कधी घेणार? असा सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे.

अमरावती : अमरावतीला ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल करीत आहे. मात्र, अतिक्रमणाने गुदमरलेले रस्ते मोकळा श्वास कधी घेणार? असा सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे. शहरातील एकच नव्हे तर तीन संकुलांच्या लिजची मुदत संपल्यानंतरही प्रशासनाकडून ते हटविण्यासाठी कोणतीच कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.टांगा पडाव ते वलगाव मार्ग, बापट चौक ते तहसील तसेच सिटी कोतवाली पोलीस ठाण्यालगतच्या लिज संपलेल्या संकुलांमुळे वाहतूक विस्कळीत होते. पादचाऱ्यांनाही त्रास होतो. या तीनही संकुलांचे लीज काही वर्षांपूर्वीच संपले असून संकुलातील व्यावसायिक रस्त्यावर अतिक्रमण करुन राजरोसपणे व्यवसाय करीत असल्याचे चित्र आहे. टांगा पाडाव ते वलगाव मार्गावर दर ५ ते १० मिनिटांनी ‘ट्रॅफीक जाम’ होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. असे असताना रस्त्यालगतचे अतिक्रमीत संकुल का हटविले जात नाही? याची कारणमिमांसा केल्यास बरेच गौडबंगाल उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. स्वातंत्र्यानंतर काही जणांना व्यवसाय करता यावा, यासाठी त्यावेळी जिल्हा प्रशासनाने लिजवर जागा दिल्या होत्या. नाममात्र भाडे घेऊन व्यावसायिकांना जागा देण्यामागे प्रशासनाचा उद्देश चांगला होता. मात्र, लिजच्या जागेवर असलेले हे अतिक्रमित संकुल आजमितीस अपघातासाठी कारणीभूत ठरु लागले आहेत. ज्यांनी नाममात्र भाडे देऊन जागा वापरली, ते कोट्यधीश झाले. परंतु लीज संपल्यानंतरही प्रशासनाला जागा परत देण्याची त्यांची मानसिकता नाही. महानगरातील प्रमुख मार्गावर हे तीन संकुल असून त्यांचे अतिक्रमण अपघातास कारणीभूत ठरत आहे. परकोट भिंतीच्या बाजूला असलेल्या या अतिक्रमीत संकुलांमुळे भीषण अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परिसरातील वाहतुकीची समस्या ऐरणीवर आली आहे. बापट चौक ते तहसील मार्गावरील संकुलांची हिच परिस्थिती आहे.