अमरावती जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेज नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयात रोज ३०० च्या आसपास रुग्ण तपासणी होत आहे. येथील सीटी स्कॅन व एक्स-रे मशीन नियमित असली तरी कधी काळ्या फिल्मसाठी रुग्णांना तासंतास ताटकळत बसावे लागत असल्याच्या तक्रारी येत आहेत. एमआरआय मशीनचा लाभ रुग्णांना केव्हा मिळणार, असा प्रश्न रुग्णांकडून केला जात आहे.
कोट
डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज तथा रुग्णालयात एमआरआय, सीटी स्कॅन, नामोग्राफीची प्रत्येकी एक आणि एक्स-रे च्या १०, तर सोनोग्राफीच्या चार मशिनी आहेत. येथे हजारावर रुग्णांची रोज तपासणी होते. सर्व मशिनी सीएमसी (देखभार-दुरुस्तीची जबाबजारी) वर असल्यामुळे नियमित सुरू आहेत.
- डॉ. अनिल देशमुख,
अधिष्ठाता, पीडीएमसी
कोट
जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत दोन सीटी स्कॅन, सात सोनाग्राफी (यूएसजी), १७ एक्स-रे मशीन्स आहेत. सर्व सुरळीत आहेत. दररोज ३०० वर ओपीडीचे रुग्ण येत असून, अन्य तपासणीदेखील नियिमत सुरू आहे. - श्यामसुंदर निकम,
जिल्हा शल्यचिकित्सक
कोट
येथील डॉक्टरांनी उपचारासंबंधी योग्य सल्ला दिला. त्यानुसार चिठ्ठी घेऊल्सकाळी ९ वाजता एक्स-रे मशीनकडे गेलो. परंतु, तेथे काळी फिल्म उपलब्ध नसल्याचे सांगून दोन वाजेपर्यंत बसवून ठेवले. यात मी एकटाच नव्हतो, तर तब्बल ५० रुग्णांचा समावेश होता. त्यामुळे तांत्रिक अडचणींमुळे येथील सेवा असमाधानकारक वाटली.
- गौतम खंडारे,
रुग्ण, अमरावती
एसटी बस अपघातात रविवारी रात्री गंभीर जखमी झालो. वरूडहून जिल्हा सामान्य रुग्णालयात शासकीय रुग्णावहिकेत सुखरूप पोहचविण्यात आले. येथील डॉक्टरांनी चांगला उपचार केला. पुढीलही उपचार येथेच केला असता, परंतु गाव बरेच लांब असल्याने परवडत नाही. त्यामुळे वरूडला पुढील उपचार घेईन.
- विजय वाघमारे,
रुग्ण, जरूड, ता. वरूड