शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

महावेध कधी घेणार अचूक हवामानाचा वेध?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 23:10 IST

शेतकऱ्यांना दर १० मिनिटांनी हवामानाची अचूक माहिती व त्या अनुषंगाने हवामानविषयक सल्ला देण्यासाठी एप्रिल २०१७ पासून जिल्ह्यातील ८९ महसूल मंडळांत स्वंयचलित हवामान केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत.

ठळक मुद्दे८९ केंद्रे कार्र्यान्वित : मुख्यमंत्र्यांच्या उद्घाटनासाठी रखडली यंत्रणा

गजानन मोहोड।आॅनलाईन लोकमतअमरावती : शेतकऱ्यांना दर १० मिनिटांनी हवामानाची अचूक माहिती व त्या अनुषंगाने हवामानविषयक सल्ला देण्यासाठी एप्रिल २०१७ पासून जिल्ह्यातील ८९ महसूल मंडळांत स्वंयचलित हवामान केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. या महावेध प्रकल्पासाठी ‘स्कायमेट वेदर सर्व्हिसेस’ या कंपनीसोबत शासनाचा ७ वर्षांचा सेवा करार झाला. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या उद्घाटनाअभावी प्रकल्प खोळंबल्याने मोफतचा सल्ला मिळण्यासाठी शेतकºयांना किमान महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.शेतीमध्ये अलीकडे प्रगत तंत्राचा वापर वाढतो आहे. बदलत्या हवामानासोबत जुळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाद्वारा माहिती दिली जाते. मात्र, ती पुरेशी व गावपातळीची नसते. यामुळे शेतकऱ्यांना दर १० मिनिटाला गावनिहाय हवामान स्थितीची माहिती व्हावी, यासाठी शासनाद्वारा ‘महावेध’ प्रकल्प साकारण्यात येऊन‘स्कॉयमेट वेदर कंपनी’सोबत ७ वर्षांचा करार करण्यात आला. त्या अनुषंगाने प्रत्येक महसूल मंडळात स्वंयचलित हवामान केंद्र सुरू करण्यासाठी महसूल विभागाने जागा उपलब्ध करून दिल्याने जिल्ह्यातील ८९ महसूल मंडळांत ही स्वंयचलित हवामान केंद्र सुरू झालीत. याचा डाटा पुण्याच्या सर्व्हरला पाठविण्यात येत असला तरी तालुक्यांना व कृषी विभागाला मात्र पाठविलेला नाही. मुख्यमंत्र्यांच्या उद्घाटनाशिवाय या प्रकल्पाची सेवा सुरू होणार नाही. त्यामुळे सात वर्षांच्या करारारातील एक वर्षाचा कालावधी वाया गेल्याचे वास्तव आहे.राज्यातील २०६५ स्वयंचलित हवामान केंद्रांद्वारा दर १० मिनिटांनी पुण्यातील सर्व्हरला माहिती पाठविण्यात येणार आहे व नंतर ती जिल्हा व तालुक्याला पाठविण्यात येईल. यासाठी लॉग इन आयडी व पासवर्ड स्कॉयमेटद्वारा संबंधितांना देण्यात येणार आहे. एसएमएसद्वारे ती शेतकऱ्यांनाही पाठविण्यात येईल. मात्र, नऊ महिन्यांपासून महावेधद्वारा अचूक हवामानाचा वेध देण्यात आलेला नाही, हेच वास्तव आहे.दर १० मिनिटाला या घटकांची नोंदया स्वयंचलित हवामान केंद्रांत तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वाºयांचा वेग आणि दिशा या हवामान घटकांची दर १० मिनिटांनी माहिती/नोंद लॉगरमध्ये घेतली जाणार आहे. दर तासाभरात ही माहिती पुण्याच्या सर्व्हरला पाठविली जाईल. त्यानंतर जिल्हा व तालुक्याला पाठविली जाईल. या माहितीच्या आधारे पीकविमा व इतर जनसुविधा सोईस्कर होणार आहे.२६ जानेवारीला ‘महावेध’चे उद्घाटनशेतकऱ्यांना दररोज हवामानाची माहिती एसएमएसद्वारे मिळावी, यासाठी जिल्हातील ८९ व राज्यातील २०६५ महसूल मंडळांत स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. मात्र, उद्घाटनाअभावी सेवा अद्याप सुरू झालेली नाही. २६ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सेवेचे उद्घाटन करतील, त्यानंतरच ही सुविधा आगामी ७ वर्षे स्कॉयमेट वेदर सर्व्हिसद्वारे शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.शेतकऱ्यांसाठी ‘स्कॉयमेट’चे अ‍ॅपशेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज दर १० मिनिटांनी मिळावा, यासाठी महावेध प्रकल्पाची केंद्रे कार्यान्वित करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात सेवा सुरू झालेली नाही. स्कॉयमेट वेदर सर्व्हिसद्वारा शेतकऱ्यांसाठी वेदर अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे. याद्वारेही शेतकºयांना हवामानाची माहिती मिळू शकते, असे सेवा पुरविणाऱ्या संस्थेने सांगितले.

राज्यात २०६५ मंडळांत स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित आहेत. दर १० मिनिटांनी हवामानाचा डाटा पुण्याच्या सर्व्हरला पाठविण्यात येत आहे. येत्या २६ तारखेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सेवेचे उद्घाटन होऊन शेतकऱ्यांना हवामानाचा संदेश देण्यात येईल.- भूषण रिनके,विदर्भ व्यवस्थापक, महावेध