लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मान्सून सध्या निकोबार बेटापर्यंत पोहोचला आहे. विदर्भात मृग नक्षत्राच्या प्रारंभाला धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. जिल्ह्यात तब्बल ४८२ गावे पूरप्रवण आहेत. या गावांसाठी आवश्यक उपाययोजनांसह विविध विभागांद्वारे मान्सूनपूर्व तयारी केव्हा, असा नागरिकांचा सवाल आहे.
लहान-मोठ्या नदी-नाल्यांच्या काठावरील या गावांना दरवर्षी कमी-अधिक प्रमाणात पुराचा फटका बसतो. यामध्ये मोठ्या नद्यांमुळे ११ गावे बाधित होतात तर लहान नदी-नाल्यांमुळे ३०२ गावांना फटका बसण्याची शक्यता आहे. अमरावती तालुक्यात ६२, तिवसा, ४५, भातकुली ३४, दर्यापूर ४८, अंजनगाव ५६, अचलपूर ५७, चांदूरबाजार २६, चांदूर रेल्वे ६, धामणगाव तालुक्यात २७ गावे पूरप्रवण आहेत. यासाठी तात्पुरत्या ७०० वर निवाऱ्यांची व्यवस्था प्रशासनाद्वारे करण्यात येते. या गावांमध्ये पोहणाऱ्या १९२८ व्यक्ती आहेत. शिवाय ३०० वर आपदा मित्र व आपदा सखी आहेत. प्रशासनाद्वारे यापूर्वी आपदा मित्र व आपदा सर्खीना बॅग, लाइफ जॅकेट, हेल्मेट, कटर, सर्च लाईट, रेनकोट, मच्छरदाणी दिली गेली.
२२६ लाइफ जॅकेट, २१६ लाइफ रिंग्जजिल्हास्तरीय पथकाजवळ सद्यःस्थितीत २२६ लाइफ जॅकेट्स, २१६ लाईफ रिंग, १०९ रोप बंडल, ८५ सर्च लाईट, २२ मेगा फोन, ४ इमर्जन्सी ऑक्सिजन कीट, १५ रोप, १५ इन्सुलेटेड फायरमन अॅक्स, १५ फायर इस्टींगुशर, ३० रबर ग्लोव्ज, ३० लेटर ग्लोव्ज, ६ मोटर बोट उपलब्ध आहेत.
उपलब्ध प्रशिक्षित मनुष्यबळजिल्हास्तर शोध व बचाव पथके - २४तालुकास्तर शोध व बचाव पथके - १६८प्राथमिक उपचार तज्ज्ञ - ०४स्कुबा डायव्हर्स - ०२मास्टर ट्रेनर्स - ५०अशासकीय संस्था (एनजीओ) - १२६आपदा मित्र, आपदा सखी - ३००रेडक्रॉस सोसायटी -४२
"मान्सूनपूर्व सर्व नियोजन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (डीडीएमए) द्वारा पूर्ण झाले आहे. यंत्रणेतंर्गत समन्वय व नियोजनाचा आढावा १४ मे रोजी होत आहे. यामध्ये नियोजन केल्या जाईल."- सौरभ कटियार, जिल्हाधिकारी