अमरावती : येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावर पीयूसी, तसेच ऑनलाईन फार्म भरून देणे, याकरिता खासगी व्यावसायिकांनी रस्त्यावर ओमनी व्हॅनमध्ये व्यावसाय थाटला आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जाणाऱ्या वाहनधारकांना अडथळा निर्माण होत आहे. याकडे महापालिका व वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
---------------------------------------------------
पंचवटी चौकातील एक सिग्नल टाईमिंग बंद
अमरावती : पंचवटी चौकातील एक सिग्नल टाईमिंग बंद असल्याने वाहनचालकांत संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे नागपूर मार्गावरून येणाऱ्या वाहनचालकांना इर्विनकडे जायचे असल्यास टाईमिंग बंद असल्यामुळे त्यांना सिंचन विभागाच्या रस्त्याकडे जाणाऱ्या टाईमिंग सुटण्याची वाट बघूनच निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे मध्येच दुसऱ्या सिग्नलवरून वाहने धावल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
--------------------------------------------------------
गाडगेनगर व्यवसायिकांव्दारे अतिक्रमण
अमरावती: गाडगेनगरमध्ये व्यावसायिकांनी फुटपाथवर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे येथे वाहतूकीला अडथळा निर्माण होत आहे. खाद्यपदार्थ, भाजीपाला विक्री, फळे विक्री करणाऱ्यांनी फुटपाथवर अतिक्रमण केले. त्यांच्याकडे येणारे ग्राहक रस्त्यावर वाहने उभी करीत आहेत.