शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सहआयुक्त केव्हा करणार गुटखा विक्रेत्यांवर कारवाई ?

By admin | Updated: February 8, 2017 00:25 IST

अंबानगरीत मोठ्या प्रमाणात पुन्हा खुलेआम गुटखा विक्री होत आहे.

अन्न औषधी विभागाची उदासीनता : पानटपऱ्यांवर खुलेआम विक्रीअमरावती : अंबानगरीत मोठ्या प्रमाणात पुन्हा खुलेआम गुटखा विक्री होत आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी अन्न व प्रशासन विभागाच्यावतीने कुठलेही प्रयत्न केले जात नाहीत. सह आयुक्त आता तुम्हीच कारवाई करा, असे मत अमरावतीकरांनी व्यक्त केले आहे. अमरावतीत विविध चौकात हजारो पाणटपऱ्या आहेत. या पाणटपऱ्यांवर सहज गुटखा उपलब्ध होतो. गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ खाल्ल्याने तरुणांना मोठ्या प्रमाणात आजार बळावत आहेत. त्यामुळे शासनाने राज्यात काही वर्र्षींपुर्वी अधिकृतरीत्या गुटखाबंदी केली आहे. परंतु सर्वत्र अन्न व सुरक्षा मानदे कायद्यांची अन्न व प्रशासन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमुळेच पायमल्ली होत असुन खुलेआम गुटखा विक्री होत असताना कारवाया मात्र थंडावल्या आहेत. अन्न व प्रशासन विभाग नुसत्या कागदी घोडे नाचविण्याकरीताच आहेत की, काय, असा सवाल नागरिकांचा आहे. राज्यात गुटखाबंदी लागू असताना अंबानगरीत गुटखा येतोच कसा, हा प्रश्न पडला आहे. येथील बडनेरा येथे काही गोदाम आहेत. त्या गोदामात अवैध गुटखासाठा मध्यप्रदेशातुन येऊन उतरतो. येथुन काही ठोक विक्रेत्यांना व तेथून अनेक किरकोळ गुटखा विक्रेत्यांना गुटखा पुरवठा होत असल्याची माहिती आहे. गेल्या तीन महिन्यात अन्न व प्रशासन विभागाने बोटावर मोजण्याइतक्या कारवाया केल्या आहेत. त्यामुळे अवैध गुटखा विक्रेत्यांना एफडीएच्या आधिकाऱ्यांची धास्ती राहिली नाही. पूर्वी २ रुपयांत मिळणारी गुटखा पुडी आता ५ रुपयांना विक्री होत आहे. सुंगधी तंबाखू पूर्वी तीन ते चार रुपयांना मिळत होते. आत ते १० ते १५ रुपयांना विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे पाणटपरीवाले गुटखा विक्रेते नागरिकांची लूट करीत आहेत. अन्न व प्रशासन विभागाचे सह आयुक्त केकरे यांनी कारवार्इंचा बडगा उगारल्यास सत्य बाहेर निघेल. (प्रतिनिधी)एफडीएची तयारी नसल्यासमहसूल विभागाने कारवाई करावी काही महिन्यांपूर्वी एफडीएच्या निष्क्रीय अधिकाऱ्यांनी कुठलीही दखल घेतली नव्हती. अंबानगरीत खुलेआम गुटखा विक्री सुरू होती. परंतु जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी स्वता पुढाकार घेऊन गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करून मोठा गुटखा साठा जप्त केला होता. त्यामुळे गुटखा विक्रेते प्रचंड धास्तावले होते. आता पुन्हा जिल्ह्यात गुटखा विक्रीचा व्यवसाय फोफावला असून अन्न व प्रशासन विभाग कारवाई करीत नसेल तर खुद्द जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी महसूल विभागाला आदेश देऊन गुटखा विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. गुटखाविक्रेत्यांना पकडण्यासाठी एक पथक तयार करण्यात येणार आहे. कुठेकुठे गुटख्याचा मोठा साठा उतरतो, त्याची माहिती मागविण्यात आली आहे. लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. एस.आर. केकरे, सहआयुक्त अन्न व प्रशासन विभाग अमरावती