इंटरनेटमुळे लोप पावतेय सुंदर हस्ताक्षर : उन्हाळ्याच्या सुटीत असावे छंद वर्गमोहन राऊ त अमरावतीग्रामीण भागात सध्याच्या आधुनिक आॅनलाईन आणि मोबाईलच्या जमान्यात हाताने लिहिली जाणारी लिखित कला म्हणजे हस्ताक्षर काळाच्या आणि इटंरनेटच्या जमान्यात लोप पावते की काय, याची चिंता कलाशिक्षकांना लागली आहे़ कलाशिक्षकांनी पुढे येऊन शाळेत हस्ताक्षराचे जादा तास घेऊन आधुनिक जमान्यात जुनं ते सोने म्हणून जतन झाले पाहिजे. अन्यवा सुंदर हस्ताक्षर हा विद्यार्थ्यांचा अनमोल खजिनाच मातीमोल होईल़प्राचीन काळापासून म्हणजे अगदी देवदेवतांच्या संत महंतांच्या काळातसुध्दा काही काव्य, भारूड, ऐतिहासिक पत्रे, लोकगीते आदी वाङ्मय प्रकाराचे लेखन करायचे म्हणजे एखाद्या व्यक्तिकरवी सुंदर हस्ताक्षरात लिहून ठेवले जायचे. त्यासाठी शाई आणि बोरूचा वापर व्हायचा. आताच्या बॉलपेनच्या जमान्यात शाईपेनचा विसर मुलांना पडत चालला आहे़ सुंदर हस्ताक्षर हा विद्यार्थ्यांचा अनमोल दागिना आहे़ ज्याचे अक्षर सुंदर आहे अशा शाळेतील विद्यार्थ्यांवर शिक्षकच नव्हे तर मित्र मैत्रिणी, नातेवाईक, परीक्षेचे पेपर तपासणारे परीक्षक त्याच्या अक्षरावर प्रसंगी त्याच्या विद्वत्तेवर प्रेम करीत असतात़ एवढेच नव्हे, तर शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर कसे सुधारेल आणि हा त्याचा दागिना टिकून रहावा यासाठी कलाशिक्षक त्याला चांगलेच राबवून घेताना दिसतात. सुंदर हस्ताक्षर हा धका धकीच्या जीवनात जिवंत रहावे यासाठी शहराच्या मध्य ठिकाणी हस्ताक्षरे सुधार वर्ग घेऊन विद्यार्थ्यांकडून वारेमाप शुल्क घेऊन पालक मुलांची इच्छा पूर्ण करीत आहेत़ या धकाधकीच्या जीवनात आधुनिक लिखाणाच्या साधनामुळे सर्वजण स्वलेखन विसरले आहेत़ काहीही लिहायचे म्हटले तर नकोसे वाटते. पालकांना आपल्या पाल्याचे हस्ताक्षर कसे सुधारेल याचीच काळजी वाटते़ सुंदर हस्ताक्षराचा फायदा खूप काही असतो. ज्याचे हस्ताक्षर सुंदर आहे अशा विद्यार्थ्याला शाळेत शिक्षकांकडून फार मोठा मान असतो़ त्याच्यावर शिक्षक मुलासारखे प्रेम करतात़ कोणत्याही परीक्षेची उत्तरपत्रिका लिहायची झालीतर ती स्वक्षराने लिहावी लागते़ मग ज्याचे हस्ताक्षर चांगले असते अशा विद्यार्थ्यांवर परीक्षक खूष होऊन अगदी चांगले मार्क्स देत असतो त्यामुळे अपेक्षेपेक्षाही टक्केवारी वाढली जाते़ त्यामुळे आता काळ बदलला आहे़ इंटरनेट, लॅपटॉप संगणक, टायपिंग, स्क्रिनटच लॅपटॉप, इतर लिखाणाची साधने याचा वापर विद्यार्थी वर्गापासून ते मोठमोठ्या अधिकाऱ्यापर्यंत होत आहे़ त्यामुळे स्वत: लिखाण करण्याचा सराव खुंटला आहे़ अर्ज लिहायचे म्हणजे या साधनाचा आधार घ्यावा लागत आहे़ हस्ताक्षर कला जिवंत आणि जतन करायची असेल तर आधुनिक साधानाकडे थोडे दुर्लक्ष केले पाहिजे़ हस्ताक्षर हा अनमोल दागिना आहे़ या म्हणीप्रमाणे आपण हस्तकलेनेच लिखाण केले पाहिजे़ तरच मोत्यासारखे अक्षर सुंदर आहे म्हणून चार चौघांत कौतुक होईल जून तेच सोनं असत. याचा प्रत्यय खरोखरच आपणास अनुभवायला मिळेल़, असा सल्ला अनेक मराठी विषयाच्या शिक्षकांनी उन्हाळ्याच्या सुटीच्या माध्यमातून दिला आहे़हस्ताक्षर सुधारण्यासाठी स्पर्धा व्हावीहस्ताक्षर कला जिवंत ठेवायची असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही़ सतत काही ना काही लिहिले गेले पाहिजे़ सुंदर हस्ताक्षर निर्माण होण्यासाठी स्वहस्ताक्षरासारख्या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या पाहिजेत. आधुनिक साधनांचा अतिवापर टाळून सतत स्वहस्ताक्षरावर लक्ष केंद्रित केले पाहिजे़, असे मत धामणगाव तालुक्यातील सोनेगाव खर्डा येथील श्रीराम विद्यालयातील मराठी विषयाच्या शिक्षिका साधना कडू यांनी व्यक्त केले आहे़
मुलांना कधी मिळणार सुंदर हस्ताक्षरांचे धडे ?
By admin | Updated: May 9, 2015 00:27 IST