शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

किती जणांना होऊन गेला कोराना हे सांगणारा 'सेरो सर्व्हे' करणार केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 05:00 IST

कोरोना झाला म्हणजे नुसता ताप, सर्दी, खोकलाच नव्हे तर सद्यस्थितीत नोंद होणाऱ्या ८० टक्के रुग्णांमध्ये कोणतेही लक्षणे नाहीत. मात्र, या व्यक्ती संसर्गाच्या वाहक आहेत. अशा स्थितीत शहरासह जिल्ह्यात किती लोकांना कोरोनाचा संसर्ग झालेला होता. हे कळायचा एकमेव मार्ग हा ‘सेरो’ सर्व्हेक्षण आहे. जी शहरे कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत तेथे हे सर्व्हेक्षण करण्यात यावे, यासाठी राज्याचा आरोग्य विभाग आणि स्थानिक महापालिका प्रशासनही सकारात्मक आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची अनास्था : पुणे, औरंगाबाद, जळगावात अंमलबजावणी

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना संक्रमण होऊ गेलेल्यांची, कारोना लढासाठीच्या अ‍ँटिबॉडिज् त्यांच्या शरीरात उपलब्ध असल्याची ओळख पटविणारी सेरोलॉजिकल चाचणी करणारे सर्व्हेक्षण अमरावती जिल्ह्यात शासनाच्या आदेशानंतर महिना उलटूनही करण्यात आलेले नाही. जिल्हा आणि आरोग्य प्रशासनाच्या अनास्थेमुळे ही ढिलाईयुरू आहे.आरोग्यमंत्री आणि आरोग्य संचालकांनी हे सर्वेक्षण करण्याचे आदेश १० ऑगस्टला दिले आहेत. सद्यस्थितीत महापालिका क्षेत्रात पाच हजारांवर कोरोना संक्रमितांची नोंद झालेली आहे. कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठीच्या अ‍ॅन्टीबॉडी (प्रतिपिंड) किती नागरिकांच्या शरीरात तयार झाल्या आहेत, याचा कुठलाही डेटा जिल्ह्यात उपलब्ध नाही.कोरोना झाला म्हणजे नुसता ताप, सर्दी, खोकलाच नव्हे तर सद्यस्थितीत नोंद होणाऱ्या ८० टक्के रुग्णांमध्ये कोणतेही लक्षणे नाहीत. मात्र, या व्यक्ती संसर्गाच्या वाहक आहेत. अशा स्थितीत शहरासह जिल्ह्यात किती लोकांना कोरोनाचा संसर्ग झालेला होता. हे कळायचा एकमेव मार्ग हा ‘सेरो’ सर्व्हेक्षण आहे. जी शहरे कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत तेथे हे सर्व्हेक्षण करण्यात यावे, यासाठी राज्याचा आरोग्य विभाग आणि स्थानिक महापालिका प्रशासनही सकारात्मक आहे. किती नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता हे समजल्यास प्रशासनालाही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे नियोजन करणे सोईचे होणार आहे. जिल्ह्यात ४ एप्रिलला पहिल्या रुग्णाची नोंद झाल्यानंतरच्या पाच महिन्यात कोरोना संक्रमितांची संख्या ग्रामीणमध्ये साधारणपणे २५०० तर महापालिका क्षेत्रात ५,००० च्या वर नोंद झालेली आहे. संसर्ग झाल्यानंतरच्या १५ दिवसानंतर या आजाराच्या ‘आयजीएम व आयजीजी’ अ‍ॅन्टीबॉडीज संबंधित व्यक्तीच्या शरीरात तयार होतात. संसर्गातून बरे झाल्यानंतरही बरेच महिने त्या टिकू शकतात. या चाचण्या करुन एसएआरएस- सीओव्ही-२ चा संसर्ग होऊन गेलेल्या तसेच लक्षणे नसलेल्या व्यक्तींचे प्रमाण समजण्यासाठी ‘सेरो’ सर्व्हे ही चाचणी महत्वाची ठरणार आहे.शहरात ०.६२ नागरिकांना संसर्गमहापालिका क्षेत्राची लोकसंख्या ८ लाख आहे. या परिस्थितीत ५ हजार नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे व ही संख्या दिवसेनदिवस वाढत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येनूसार शहरातील संसर्गाचे प्रमाण हे ०.६२ टक्के आहे. या पेक्षा कमी प्रमाण असणाºया शहरात ‘सेरो’ सर्व्हे झालेला असतांना अमरावतीमध्ये रखडलेला आहे.काय आहे सेरोलॉजिकल सर्व्हेएखाद्या विशिष्ठ कारणांसाठी अनेकांची रक्त तपासणी केली जाते. त्याला ‘सेरोलॉजिकल सर्व्हे’ असे वैद्यकशास्त्रात म्हटल्या जाते. या तपासणीद्वारे रक्तात काही आजाराचे प्रतिपिंड (अ‍ॅन्टीबॉडी) तयार झालेले आहेत का, याविषयीचे पृथक्करण केल्या जाते. त्या व्यक्तीच्या श्रिरातील प्रथिनांच्या रचनेचा अभ्यास करुन आजारास सामोरे जाण्याच्या प्रतिकार शक्तीचे अनुमान बांधल्या जातात व यावर संसर्गाचे प्रमाणाचाही अंदाज येतो. यासाठी हे सर्वेक्षण आवश्यक आहे.‘सेरो’ सर्व्हेक्षण कशासाठी?उच्च जोखीम असलेल्या आरोग्य सेवा कर्मचारी, कामगार, इम्युनो कॉप्रोमाईज्ड व्यक्ती, कंटेनमेंट झोनमधील व्यक्ती संक्रमित झाल्या होत्या काय, हे सर्व्हेक्षणातून स्पष्ट होते. यासोबतच प्रत्येक वॉर्डात रॅण्डम पद्धतीने नागरिकांच्या रक्त नमुन्यांची तपासणी करुन त्यांच्यामध्ये अ‍ॅन्टीबॉडी तयार झालेल्या आहेत का, शहरात हर्ड इम्युनिटी (सामुहिक प्रतिकारक शक्ती) याची माहिती होऊन उपाययोजनांची दिशा ठरविली जाते.जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये सर्व्हेक्षण करता येणार नाही. मात्र, काही प्रमाणात कमी आल्यानंतर सेरो सर्व्हेक्षण केल्या जाईल.शैलेश नवालजिल्हाधिकारी‘सेरो’ सर्व्हेसाठी कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक पाहिजे. यामध्ये प्रत्येक चाचणीला ६०० रुपये खर्च येईल. तो कोण करणार, आम्ही सहकार्य करायला तयार आहे.डॉ अनिल रोहनकरजिल्हाध्यक्ष, आयएमए.जिल्ह्यात ‘सेरो’ सर्व्हेक्षण करण्यासंदर्भात शासनाच्या अद्याप सुचना नाहीत. यासंदर्भात काय निकष आहेत. याची आपनास माहिती नाही.श्यामसुंदर निकम.जिल्हा शल्य चिकित्सक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या