शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बँकेसमोरची अस्ताव्यस्त वाहतूक केव्हा हटणार ?

By admin | Updated: July 22, 2016 00:34 IST

येथील वर्दळीच्या मार्गावर असणाऱ्या भारतीय स्टेट बॅँकेसमोर सर्रास रस्त्यावरच दुचाक्या चारचाकी गाड्या उभ्या राहत असल्याने .....

बँक प्रशासनाचे दुर्लक्ष : अपघाताची शक्यता बडनेरा : येथील वर्दळीच्या मार्गावर असणाऱ्या भारतीय स्टेट बॅँकेसमोर सर्रास रस्त्यावरच दुचाक्या चारचाकी गाड्या उभ्या राहत असल्याने सुरळित वाहतुकीला मोठा अडसर निर्माण होत आहे. बॅँक प्रशासनाने याकडे लक्ष पुरविण्याची गरज असल्याचे बोलल्या जात आहे. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही. तळ्यावस्तीच्या चांदणी चौकालगत भारतीय स्टेट बॅँकेची इमारत आहे. ज्या भागात ही बॅँक आहे तेथून रेल्वे स्टेशन जवळ आहे. लागूनच वस्ती आहे. रेस्टहाऊस तसेच शाळा महाविद्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर बॅँक असल्यामुळे येथून वाहतुकीची मोठी वर्दळ असते. या बॅँकेचे मोठ्या संख्येत खातेदार आहे. पर्यायाने बॅँकेसमोर दुचाकी तसेच चारचाकी वाहनांची येथे रांग असते. बॅँकेत येणाऱ्या ग्राहकांना नाईलाजास्तव वाहन रस्त्यावरच उभे करावे लागते. बॅँक प्रशासनाच्या नियोजन शून्यतेमुळे वाहतुकीच्या रस्त्यावरच वाहनांचा बोजवारा सुरळीत वाहतूकदार तसेच पायदळ चालणाऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे. बॅँकेसमोर खुली जागा आहे. मात्र वाहनचालकांना तशी व्यवस्थाच केलेली नाही. या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांत बॅँक प्रशासनाबाबत रोष व्यक्त केल्या जात आहे. बॅँकेच्या खुला जागेतच ग्राहकांच्या गाड्या लावण्याचे नियोजन करण्यात यावे. ज्यामुळे हा रस्ता मोकळा राहील व सुरळीत वाहतुकदारांना नाहक मन:स्ताप सहन करण्याची वेळ येणार नसल्याचे नागरिकांत बोलले जात आहे. एक लाख लोकवस्तीच्या बडनेरा शहरासह परिसरातील बऱ्याच खेड्यांवरील नागरिक या बॅँकेचे खातेदार आहे. येथे ग्राहकांची गर्दी असते. पार्किंग व्यवस्थेसह बॅँकेत खातेदारांना बसण्याची व्यवस्थासुद्धा नाही. तासन्तास ग्राहक ताटकळत उभे राहतात. दोन्ही बाबींची व्यवस्था करण्यात यावी, असे बोलल्या जात आहे. (श.प्र.)