शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांनी पाडला भाव, कारवाई केव्हा ?

By admin | Updated: April 26, 2017 00:18 IST

शासकीय तूर खरेदी केंद्रांना मुदतवाढ नाही व केंद्रात पडून असलेली २.३५ लाख क्विंटल तूर खरेदी होणार की नाही, ...

बाजार समित्यांमधील स्थिती : यंदा निम्मी तूर केली व्यापाऱ्यांनी खरेदीअमरावती : शासकीय तूर खरेदी केंद्रांना मुदतवाढ नाही व केंद्रात पडून असलेली २.३५ लाख क्विंटल तूर खरेदी होणार की नाही, याविषयी साशंकता असल्याने सोमवारी व्यापाऱ्यांनी हमीपेक्षा १००० ते १५०० रूपये क्विंटलनी भाव पाडले आहे. शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या या व्यापाऱ्यांवर कारवाई केव्हा, असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे.शेतकऱ्यांना हमीभावाचे संरक्षण शासनाद्वारा दिले आहे. यापेक्षा कमी भाव असल्यास शासन खरेदी करेल असे शासनाचे अभिवचन असताना शासकीय तूर खरेदी केंद्र मुदतवाढीचा निर्णय फिरविला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी षडयंत्र रचून भाव पाडला. शासनाने तूर्तास मार्केट यार्डावरील तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र केंद्रांना मुदतवाढ नाकारल्याने घरी असलेल्या तुरीच्या घुगऱ्या कराव्या काय, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. सहा महिन्यापूर्वी ११ ते १२ हजार रूपये प्रति क्विंटल तुरीचा भाव असताना आता ३५०० रुपयांनी व्यापारी मागणी करीत आहे. केंद्राने तूर डाळीवर १० टक्के आयात शुल्क लावले,तेही शेतकऱ्यांच्या नाकातोंडात पाणी गेल्यावर. सरसगट देशांसाठी नाही, तर तुरीचे अल्प उत्पादन असणाऱ्या देशासाठी आहे. केंद्राने जर शासकीय तूर खरेदी केंद्राला मुदतवाढीची परवानगी नाकारली तर राज्य शासनाने ही तूर खरेदी करावी, असा सूर शेतकऱ्यांचा आहे. शेतकऱ्यांच्या प्रतिकूल स्थितीत व्यापाऱ्याद्वारा लूट होत असल्याने या व्यापाऱ्यांवर कारवाई केव्हा करण्यात येणार, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांद्वारा उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)टोकन दिलेल्या तुरीची होणार खरेदीदिलासा : बच्चू कडूंच्या आंदोलनाची धास्ती चांदूरबाजार: स्थानिक बाजार समितीत आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या आंदोलनाचा धसका घेत टोकन देऊन मोजणीअभावी यार्डात असलेल्या तुरीची मोजणी करण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांना कळविण्यात आले आहे.चांदूरबाजार बाजार समितीत डीएमओच्या माध्यमातून १ हजार २२ शेतकऱ्यांची २१ हजार ६१४ क्विंटल तूर २२ एप्रिलपर्यंत खरेदी झाली. १ हजार ८०८ शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले होते. त्यांच्या २३ हजार २३ पोत्यांची मोजणी करण्यात येणार आहे. कडूंच्या आक्रमक पावित्र्यामुळे प्रशासनाने धास्ती घेतली असून यार्डातील तूर खरेदीचे निर्देश देण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)तूर उत्पादकांना ३० कोटींचा चुकारा परतवाडा : अचलपूर बाजार समितीमध्ये जिल्हा मार्केटिंग विभागाच्या माध्यमातून तूर खरेदी करण्यात येत होती. २२ एप्रिलला तूर खरेदी बंदचे आदेश मिळाले होते. यावेळी अचलपूर बाजार समितीमध्ये २ हजार ४०८ शेतकऱ्यांची ५३ हजार ६५७ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली होती. ३० मार्चपर्यंत खरेदी करण्यात आलेल्या तुरीचा चुकारा शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. आतापर्यंत १८ कोटी रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले आहे. एकूण तूर खरेदीच्या चुकाऱ्यापोटी ८२ कोटी रुपये थकबाकी आहेत. आमदार बच्चू कडू यांनी सोमवारी तूर खरेदी करावी, अशी मागणी करीत आंदोलनाचा इशारा दिला होता. याचेवळी त्यांनी पणनमंत्र्यांशी चर्चा केली होती. केंद्रावर आतापर्यंत ३.५३ लक्ष क्विंटल तूर खरेदीकेंद्र बंद होण्याच्या अंतिम दिनापर्यंत दहाही केंद्रावर १६,८३२ शेतकऱ्यांची ३५२४३५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. यात चांदूररेल्वे येथे १४०० शेतकऱ्यांची २२१०५, नांदगाव ५१३ शेतकऱ्यांची ९०५७, मोर्शी १५०० शेतकऱ्यांची २९८०८, अमरावती १७१९ शेतकऱ्यांची ४५०७१, धामणगाव १९९८ शेतकऱ्यांची ३२४५८, अचलपूर २४०८ शेतकऱ्यांची ५३६५७, अंजनगाव १२९० शेतकऱ्यांची २९४९८, चांदूरबाजार १०२२ शेतकऱ्यांची २१६१४.४८, दर्यापूर २७४२ शेतकऱ्यांची ६९०२५.५०, वरूड २०६६ शेतकऱ्यांची ३८३९१, धारणी १७४ शेतकऱ्यांची १७४७.६४ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली.२.३४ लाख पोते केंद्रावर पडूनकेंद्रावर सद्यस्थितीत २ लाख ३४ हजार २९७ पोती तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. यामध्ये चांदूररेल्वे २०००, नांदगाव ८५००, मोर्शी १२०००, अमरावती ३६०००, धामणगाव २०२५०, अचलपूर २५२५८, अंजनगाव २५२५५, चांदूरबाजार २३०२३, दर्यापूर ५१५४१, वरूड २८००० व धारणी केंद्रावर २५०० पोते तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. १४,५९८ शेतकऱ्यांना दिले टोकनसर्व केंद्रांवर १४५९८ शेतकऱ्यांना टोकन देण्यात आलेले आहे. यात चांदूररेल्वे ५९, नांदगाव ३००, मोर्शी ६००, अमरावती २६४९, धामणगाव ३४८, अचलपूर २६६३, अंजनगाव १३०८, चांदूरबाजार १८०८, दर्यापूर ३५२१, वरूड ८८७, धारणी ४५५ शेतकऱ्यांना टोकन दिलेले आहेत.