शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
3
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
4
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
7
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
8
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
9
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
10
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
11
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
12
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
13
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
14
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
15
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
16
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
17
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
18
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
19
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
20
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश

शाळा सुरू झाल्यात, महाविद्यालये केव्हा उघडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:27 IST

विद्यार्थी संघटनांचे आंदोलन, कॉलेज उघडण्याच्या तारखेकडे विद्यार्थ्यांचे लक्ष अमरावती : कोरोना संसर्गाचा आलेख चढ-उतार होत असताना इयत्ता पाचवी ...

विद्यार्थी संघटनांचे आंदोलन, कॉलेज उघडण्याच्या तारखेकडे विद्यार्थ्यांचे लक्ष

अमरावती : कोरोना संसर्गाचा आलेख चढ-उतार होत असताना इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. मात्र, जिल्ह्यातील महाविद्यालये बंदच आहे. नवीन वर्षात जानेवारीपासून कॉलेज उघडतील, अशी अपेक्षा होती. परंतु, कॉलेज सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांची निराशा झाली आहे. महाविद्यालये केव्हा सुरू होणार, याकडे विद्यार्थ्यासह प्राचार्य, प्राध्यापकांचे लक्ष लागून आहे. अभाविपने मंगळवारी महाविद्यालये उघडा आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.

मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गामुळे महाविद्यालये बंद आहे. शिक्षण क्षेत्रात हा मोठा फटका बसला आहे. शैक्षणिक उपक्रम, परीक्षा, अभ्यासक्रम आदी विस्कळीत झाले आहे. २३ नोव्हेंबर २०२० पासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले तेव्हापासून शाळेची पहिली घंटा वाजली. आता २७ जानेवारी २०२१ पासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले असून शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट पाहावयास मिळत आहे. मात्र, अद्यापही महाविद्यालये बंदच आहे. हिवाळी परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या असून, उन्हाळी २०२१ परीक्षांचा पत्ता नाही. विद्यापीठाने चालू शैक्षणिक सत्र जाहीर केले असले तरी त्याचा पुरता बाेजवारा उडाला आहे. पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. त्यामुळे कोरोना नियमावलींचे पालन कॉलेजचे विद्यार्थी अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतात. असे असताना नेमकी महाविद्यालयेच बंद का? असा प्रश्न विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

---------------------

एकृूण महाविद्यालये - ११८

एकूण विद्यार्थी- ९८, ७७५

-------------------

शैक्षणिक नुकसानाला जबाबदार कोण?

कोरोनामुळे गत १० महिन्यांपासून महाविद्यालये बंद आहेत. ऑनलाईन पद्धतीने शिक्षणाचे धडे मिळता असले तरी विज्ञान व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण मिळणे अपेक्षित आहे. विद्यार्थी हे महाविद्यालये सरू होणाच्या प्रतीक्षेत आहेत. महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

--------------------

कोट

महाविद्यालये सुरू होणे आता काळाची गरज झाली आहे. किती दिवस शिक्षणापासून विद्यार्थी दूर राहतील, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्यक्ष शिकवणीसाठी महाविद्यालये सुरू करण्यासाठी ‘कॉलेज उघडा’ हे आंदोलन करण्यात आले.

- रवी दांडगे, अभाविप.

---------

कोट

यूजीसीच्या निर्देशानुसार कॉलेज, विद्यापीठाचे शिक्षण सुरू करणे अपेक्षित आहे. त्याअनुषंगाने कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना अगोदरच निवेदन सादर केले आहे. शासन जर सर्व काही सुरू करण्यावर भर देत असल तर महाविद्यालये, विद्यापीठच बंद का?. त्यामुळे कॉलेज लवकर सुरू व्हायला हवे.

- योगेश चव्हाण, एआयएसएफ.

--------------------

कोट

१० महिन्यांपासून घरी असल्याने कंटाळा आला आहे. वर्गात शिक्षण घेण्याचा वेगळा अनुभव येतो. आता कॉलेज सुरू झाले पाहिजे. उन्हाळी परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण व्हायचा आहे. परीक्षांचा ताण आला आहे. महाविद्यालये लवकर सुरू झाल्यास अभ्यासक्रम पूर्ण करता येईल.

- पूजा रोकडे, विद्यार्थिनी, बडनेरा.

-----

कोट

कोरोना विषाणूचा प्रभाव कमी होत आहे. गत १० महिन्यांपासून महाविद्यालये बंद आहे. नवीन शैक्षणिक सत्राचा अभ्यासक्रम पूर्ण करावयाचा आहे. परीक्षा, निकालाची काळजी आहे. आता महाविद्यालये सुरु झाली पाहिजे. शासनाने त्यादिशेने सकारात्मक विचार करावा.

- निखिल गोरे, विद्यार्थी, मोर्शी

------------------------