शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

११०० कोटींचे कर्जवाटप केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 22:34 IST

प्रत्येक वेळी तंबी देऊन काम भागत नाही, तर कधी कृतीही पाहिजे. मात्र, जिल्हा प्रशासनाला अद्यापही हे साध्य न झाल्यामुळे बँका तंबीला जुमानेनासा झालेल्या आहेत. त्यामुळे चार महिन्यांच्या अवधीत खरीप पीक कर्जवाटपाचा टक्का २६ वरच रखडलेला आहे. अद्यापही ११५३ कोटींचे वाटप बाकी असल्याने या बँकावर नियंत्रण कुणाचे, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.

ठळक मुद्देकृषिमंत्र्याच्या गृहजिल्ह्यातील वास्तव : बँका जुमानेना, जिल्हा प्रशासनाचा अंकुश कुठे?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रत्येक वेळी तंबी देऊन काम भागत नाही, तर कधी कृतीही पाहिजे. मात्र, जिल्हा प्रशासनाला अद्यापही हे साध्य न झाल्यामुळे बँका तंबीला जुमानेनासा झालेल्या आहेत. त्यामुळे चार महिन्यांच्या अवधीत खरीप पीक कर्जवाटपाचा टक्का २६ वरच रखडलेला आहे. अद्यापही ११५३ कोटींचे वाटप बाकी असल्याने या बँकावर नियंत्रण कुणाचे, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.सलग चार वर्षांच्या दुष्काळामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहे. त्यामुळे खरिपासाठी आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना कर्जवाटपास जिल्ह्यातील बँकाचे असहकार्य आहे. मागील हंगामातदेखील बँकांचा नन्नाचा पाढा होता. वारंवार सूचना देऊनही राष्ट्रीयीकृत बँका जुमानत नसल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील स्टेट बँक आॅफ इंडिया व जिल्ह्यात लीड बँक असलेल्या सेंट्रल बँक आॅफ इंडियाची खाती बंद केली तसेच काही प्रकरणात व्यवस्थापकांवर गुन्हेदेखील दाखल करण्यात आले होते. परिणामी या बँकांची नामुष्की झाल्याने त्यांनी कर्जवाटपाचा टक्का वाढविला होता. तत्कालीन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनीदेखील बँक व्यवस्थापनाला निकराचा इशारा दिला होता. त्याच्या परिणामी कर्जवाटपाची गती वाढली होती. यंदा मात्र केवळ इशारे दिले जात असल्याने बँक व्यवस्थापनावर फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे पालकमंत्री तथा कृषिमंत्री अनिल बोंडे व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याद्वारे प्रत्यक्ष कृती केव्हा, असा शेतकºयांचा सवाल आहे.यंदाच्या खरीप हंगामासाठी १ एप्रिल २०१९ पासून कर्जवाटप सुरू झाले. प्रत्यक्षात जून अखेरपासून सुरुवात झाली. जिल्हा बँकेनेदेखील सुरुवातीला धडाका लावला व आता प्रक्रिया रखडली आहे. राष्ट्रीयीकृत बँकांचा टक्का सुरुवातीपासून मंदावला आहे. त्यामुळे कर्जवाटपाचा टक्का अद्याप वाढलेला नाही. जिल्ह्यात यंदाच्या खरिपासाठी २ लाख ६० हजार ५७० शेतकऱ्यांना १६८५ कोटी रुपये कर्जवाटपाचे लक्ष्यांक होते. त्यातुलनेत सद्यस्थितीत बँकांनी ३९ हजार ९७० शेतकºयांना ४३१ कोटी ८७ लाखांचे वाटप केले. अद्यापही ११५३ कोटी १३ लाखांचे कर्जवाटप झालेले नाही.असे आहे बँकनिहाय कर्जवाटपराष्ट्रीयीकृत बँकांना यंदाच्या खरिपासाठी १,६६,५७० शेतकºयांना ११४०.५० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक आहे. त्यातुलनेत सद्यस्थितीत २१,०५६ शेतकऱ्यांना २७४.१६ कोटींचे वाटप करण्यात आले . ही टक्केवारी २४ आहे.ग्रामीण बँकांना यंदाच्या खरिपासाठी २,००० शेतकऱ्यांना १४.५० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक आहे. त्या तुलनेत सद्यस्थितीत ४१० शेतकºयांना ४.४४ कोटींचे वाटप करण्यात आले. ही टक्केवारी ३१ आहे.जिल्हा बँकेला यंदाच्या खरिपासाठी ९२,००० शेतकºयांना ५३० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक आहे. त्या तुलनेत सद्यस्थितीत १८,५०४ शेतकºयांना १५३.२७ कोटींचे वाटप करण्यात आल. ही टक्केवारी २९ आहे.शेतकऱ्यांना कर्जवाटपासाठी बँकांद्वारे कर्जमेळावे घेतले जात आहे. हेतुपुरस्सर कर्ज नाकारले जात असल्यास त्या व्यवस्थापकावर गुन्हा नोंदविला जाईल- अनिल बोंडेपालकमंत्रीसर्वच बँकाना कर्जवाटपाचा टक्का वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. बँका कर्ज देत नसल्यास शेतकऱ्यांनी सहकार किंवा महसूल विभागाकडे तक्रार करावी.- शैलेश नवाल जिल्हाधिकारी