शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती केव्हा? खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांना घरघर, कर्मचाऱ्यांचे वेतन थांबले

By गणेश वासनिक | Updated: October 18, 2022 19:34 IST

शासनाच्या समाजकल्याण विभागाकडून ७० टक्के देयके अप्राप्त

अमरावती: राज्यात एससी, ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी, एसटी आणि ईबीसीधारक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शु्ल्क प्रतिपूर्तीची रक्कम गत तीन वर्षांपासून राज्य सरकारने दिली नाही. त्यामुळे खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी यांच्यापुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीची रक्कम न मिळाल्याने गत आठ महिन्यांपासून खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन झाले नाही. परिणामी यंदा दिवाळी अंधारात जाणार असल्याची दाट शक्यता आहे.

शासनाच्या महाडीबीटी या वेब पोर्टलद्वारे देण्यात येणाऱ्या शैक्षणिक प्रतिपूर्तीमध्ये होणाऱ्या विलंबामुळे खासगी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. शैक्षणिक वर्ष २०१८-२०१९ पासून शासनाच्या महाडीबीटी या वेब पोर्टलद्वारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व फ्रिशिप अर्ज मंजूर येत असते. मंजूर असणाऱ्या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्याचे शुल्क दोन टप्प्यांमध्ये शासनाच्या समाज कल्याण विभागाद्वारे महाविद्यालयाच्या खात्यामध्ये जमा केली जाते. मात्र, सत्र २०१८-२०१९ पासून मंजूर असलेल्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीमध्ये बराच विलंब होत आहे.

त्यामुळे खासगी अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांचे वेतन सहा ते आठ महिन्यांपासून झाले नाही. पाच दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. या जमा होणाऱ्या शैक्षणिक शुल्काच्या रकमेवर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केले जाते. तथापि, वेतन मिळेल, याची शाश्वती नाही अशी ओरड कर्मचाऱ्यांची आहे. प्रतिपूर्तीची ३० टक्के रक्कम मिळाली, पण ७० टक्के अद्यापही प्रलंबित आहे. त्यामुळे खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये चालविणे आजच्या घडीला फार कठीण झाल्याची भावना संस्थाचालकांसह प्राचार्याची आहे.अमरावती विभागात २३ अभियांत्रिकी महाविद्यालयात वेतनाची वानवाअमरावती विभागातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात खासगी २३ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीचा प्रश्न राज्यभरातील आहे. अभियांत्रिकी कर्मचारी संघटनेच्या वतीने शुक्रवारी अमरावती येथील समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांना निवेदन सादर करुन प्रलंबित शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीची रक्कम मिळावी, अशी मागणी केली आहे.

एससी, ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी, एसटी आणि ईबीसीधारक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शु्ल्क प्रतिपूर्तीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. हा प्रश्न वेळीच सुटला नाही तर, भविष्यात मागासवर्गीय विद्यार्थ्याच्या अभियांत्रिकी प्रवेशाचा गुंता जटिल होईल. शासनाने त्वरित रक्कम अदा करावी. प्रवीण पोटे पाटील, आमदार तथा संचालक अभियांत्रिकी महाविद्यालय

टॅग्स :Amravatiअमरावतीcollegeमहाविद्यालय