शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठात नव्या कुलगुरू निवडीबाबत मुहूर्त केव्हा?

By गणेश वासनिक | Updated: April 20, 2023 18:35 IST

अडीच महिन्यांपासून शोध समितीचे गठन नाही, प्रभारी कुलगुरूंवर दोन विद्यापीठांच्या कामकाजाचा ताण

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू शोध समितीबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची प्रक्रिया राजभवन अथवा राज्य शासनाने सुरू केली नाही. तत्कालीन कुलगुरू दिवंगत डॉ. दिलीप मालखेडे यांच्या निधनाला अडीच महिन्यांचा कालावधी लोटला असून, नवीन कुलगुरू निवडीबाबत समितीदेखील गठीत होऊ नये, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

तत्कालीन कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे २८ जानेवारी २०२३ रोजी निधन झाले. काही दिवस कुलगुरू पदांचा कारभार प्र-कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे यांच्याकडे राजभवनाने सोपविला होता. तथापि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगरचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे ४ फेब्रुवारी २०२३ पासून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा प्रभार सोपविण्याचा निर्णय राजभवनातून घेण्यात आला. हल्ली कुलगुरू डॉ. येवले हे अमरावती आणि संभाजीनगर अशा दोन्ही विद्यापीठांच्या कुलगुरूपदांची जबाबदारी सांभाळत आहेत. अमरावती विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू नसल्याने अनेक बाबींवर तोडगा अथवा निर्णय घेताना प्रशासनाला अडचणी येत असल्याचे वास्तव आहे.

समिती गठन झाल्याशिवाय कुलगुरूंची निवड अशक्यराज्यपालांकडून कुलगुरू निवडीसाठी समिती गठीत झाल्याशिवाय नवीन कुलगुरू मिळत नाही. ही समिती राजभवनातून गठीत केली जाते. अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती, तर सदस्य म्हणून विद्यापीठ प्रतिनिधी, राज्य प्रतिनिधी, प्रधान सचिव अशी चार जणांची समिती असते.अर्ज मागविण्यासाठी नोडल अधिकारी होते नियुक्तकुलगुरू पदांसाठी पात्र व्यक्तिंचे ऑनलाइन अर्ज मागविण्यासाठी विद्यापीठ अथवा शैक्षणिक संस्थांमधून एक नोडल अधिकारीनेमला जातो. हा नोडल अधिकारी कुलगुरू पदांसाठी आलेल्या अर्जांची छाननी करणे, अपात्र अर्जदार वगळणे आणि त्यानंतर पात्र उमेदवारांची यादी निवड समितीकडे पाठविणे अशी प्रक्रिया राबवितो. निवड समितीने एकूण पाच नावे कुलगुरू पदासाठी पात्र ठरवावी लागतात. ती नावे राजभवनाकडे मुलाखतीसाठी पाठविण्याची कार्यवाही नोडल अधिकाऱ्यांना करावी लागते.