शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाटी-पेन्सील धरणारे हात भीक मागू लागतात तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 05:00 IST

औरंगाबादेत अलीकडेच भीक मागण्यासाठी लहान मुलांची खरेदी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. काही दिवसांपासून लहान मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रिय झाल्याची चर्चा आहे. परंतु, अमरावतीत लहान मुलांना त्यांच्या आई-वडिलांकडूनच भीक मागण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे वास्तव आहे. वाहतूक सिग्नलवर मुुले भीक मागतात आणि आई-वडील पैसे गोळा करताना दिसतात.

गणेश वासनिकलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, अशी राज्य शासनाची ‘टॅग लाईन’ आहे. मात्र, ज्या हातात पाटी-पेन्सिल असावी त्या हातात भीक मागण्यासाठी कटोरा आला. हे विदारक चित्र शहरातील राजकमल, तहसील, पंचवटी, श्याम व इर्विन चौकात सिग्नलवर पाहावयास मिळत आहे. या निरागस बालकांना भीक मागण्यासाठी त्यांच्या आई-वडिलांकडूनही बळ मिळत असल्याचे वास्तव आहे.औरंगाबादेत अलीकडेच भीक मागण्यासाठी लहान मुलांची खरेदी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. काही दिवसांपासून लहान मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रिय झाल्याची चर्चा आहे. परंतु, अमरावतीत लहान मुलांना त्यांच्या आई-वडिलांकडूनच भीक मागण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे वास्तव आहे. वाहतूक सिग्नलवर मुुले भीक मागतात आणि आई-वडील पैसे गोळा करताना दिसतात. शासनाकडून विशिष्ट समुदायासाठी अन्न, वस्त्र, निवाऱ्याचे नियोजन करण्यात आले असून, योजनादेखील आहेत. मात्र, निरक्षरता, अज्ञान, व्यसन, दारिद्र्य, कूप्रथामुळे विशिष्ट समुदायातील ही मुले भीक मागतात आणि भावी जीवनात ते वाममार्गाला लागत असल्याचे अनेक उदाहरण आहेत.

भीक मागतात त्याच भागात वास्तव्यशहरातील राजकमल चौक, श्याम चौक, जयस्तंभ, पंचवटी चौकात भीक मागणारी मुले रात्री त्याच भागात आई-वडिलांसह वास्तव्य करीत असल्याचे दिसून येते. उड्डाण पुलाखालील जागा ही भिक्षेकऱ्यांचे आश्रयस्थान झाले आहे. पुलाखालीच ‘किचन’ थाटले जाते. रात्रीला उघड्यावर विश्रांती आणि दिवसा सिग्नलवर भीक मागणे, हा त्यांचा शिरस्ता आहे.

कोरोनाकाळात मुंबईहून आलेले कुटुंब स्थायिककोरोनाकाळात मुंबईहून अनेक कुटुंब अमरावतीत परतले. मात्र, दीड वर्षापासून ते अमरावतीतच भीक मागून उपजिविका भागविणे ही नित्याचीच बाब झाली आहे. भीक मागणारे बालके जिल्ह्यातील विविध भागातील आहेत. मात्र, ना शिक्षण, ना सामाजिक भान, अशीच त्यांची स्थिती आहे.  भीक मागणाऱ्या मुलांमुळे पोलीस वैतागले आहे. 

गुटखा, अन्य नशेच्या आहारी जाताहेत ही मुलेदिवसभर सिग्नलवर भीक मागून पैसा गोळा करणारी ही मुले गुटखा किंवा अन्य नशेच्या आहारी जात असल्याचे वास्तव आहे. शिक्षणाचा गंध नसल्यामुळे भविष्यात काय होईल, याचे भान नाही. त्यामुळे ही निरागस मुले बिनधास्तपणे नशेच्या आहारी जात आहेत. ही मुले आई-वडिलांसोबतच गुटखा निर्भिडपणे खात असल्याचे दिसून येत आहे.

भीक मागणारी काही मुले पोलीस सहकार्य व बालकल्याण समितीच्या आदेशाने ताब्यात घेऊन बालगृहात ठेवण्यात आले होते. मात्र, या मुलांच्या आई-वडिलांनी मोठा गोंधळ घातला. पोलिसांना त्रस्त केले. अखेर त्या मुलांना सोडून देण्यात आले. पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार लवकरच या मुलांचे रेस्क्यू केले जाईल. - अमित कपूर, समन्वयक, चाईल्ड लाईन

 

टॅग्स :Beggarभिकारी