शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

अतिक्रमणातून मोकळा श्वास कधी ?

By admin | Updated: December 28, 2016 01:45 IST

राजकमल, जयस्तंभ, गांधी, सरोज, चित्रा, इतवारा येथील उद्योग वर्गाच्या इमारती अतिक्रमणमुक्त झाल्या आहेत.

दुकानासमोरील जागा भाड्याने : अनेकांना धनलाभ, महापालिकेसह वाहतूक शाखेचे दुर्लक्ष अमरावती : राजकमल, जयस्तंभ, गांधी, सरोज, चित्रा, इतवारा येथील उद्योग वर्गाच्या इमारती अतिक्रमणमुक्त झाल्या आहेत. अनेक बड्या प्रतिष्ठानधारकांनी स्वमालकीचा दुकानासमोरील जागा चक्क भाड्याने दिल्या असून अनेकांना यातून धनलाभ होत आहे. या अतिक्रमणाकडे महापालिकेसह शहर वाहतूक शाखेने दुर्लक्ष चालविले आहे. आज एकीकडे मध्यवस्तीतील हा परिसर विकसित म्हणून ओळखल्या जातो. तरी या प्रभागात वाढते अतिक्रमण ही समस्या दिवसागणिक गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे परिसराची अवस्था वाईट होत चालली आहे. शहराचे मुख्य बाजारपेठ म्हणून नावलौकिक असलेल्या या भागात भरमसाठ व्यावसायिक संकुले उभी राहली, तथापि पार्किंगची सुविधा न ठेवल्याने वाहनांच्या अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राजकमल, चित्रा, सरोज, अंबादेवी रोड, बडनेरा रस्ता, राजापेठ, नमुना या भागात अनधिकृत पार्किंग समस्या वाढत चालली आहे. वाढत्या अतिक्रमणाने रस्ते अरुंद बनलेत. सरोज चौकातून जवाहर गेटकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा वाहनांची भलीमोठी पार्किंग लागत असल्याने या रस्त्याने पादचाऱ्याने चालावे तरी कसे? असे चित्र आहे. या परिसरात सध्या अनेक नवे बांधकाम सुरु असून पार्किंगसाठी मात्र जागाच सोडली नसल्याचे चित्र आहे. प्रशासनाने त्याची दखल घेणे गरजेचे आहे. पण पालिका या प्रश्नाकडे लक्ष देतान दिसत नाही. शहराची या हृदयस्थानी वाहनांच्या संख्येसोबतच अनधिकृ पार्किंग आणि फेरीवाल्यांची संख्याही वाढली आहे. या प्रभागात मोठ्या प्रमाणात पुनर्विकासाचे काम झाल्याने इमारतीही वाढल्या. मात्र रस्त्यावरच पार्किंग होत असल्याने त्याचा फटका नागरिकांना बसतो. (प्रतिनिधी) रघुवीरमुळे वाहतूक कोंडी श्याम चौकातील रघुवीरसमोर चारचाकी वाहनांची भलीमोठी पार्किंग लागत असल्याने या मार्गावर रोज दुपारी - संध्याकाळी ‘जाम’ लागतो. रघुवीरची पार्किंग व्यवस्था टॉकीजच्या आता असताना बिनबोभाटपणे रस्त्यावर वाहने लावण्याच्या सूचना रघुवीरकडून केल्या जातात. पालिका प्रशासन मात्र रघुवीरबाबत मौन धारण करून आहे. हॉटेल्सचे पार्किंग बेपत्ता राजकमल चौकात नव्याने दोन हॉटेल्स लागली आहेत. मात्र या दोन्ही हॉटेल्सकडे पार्किंग व्यवस्थाही ग्राहकांसह तेथील मालक, कर्मचाऱ्यांच्या वाहने भररस्त्यावर उभी केली जातात. मात्र या हॉटेलधारकांना नोटीस बजावण्याचे सौजन्य पालिकेला दाखविता आलेली नाही.