शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसांपासून रुग्णवाहिकेची चाके थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:13 IST

अमरावती / संदीप मानकर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना, रुग्णसंख्याही वाढली होती. तेव्हा कोरोना रुग्णांना सेवा देताना रुग्णाला एका ...

अमरावती / संदीप मानकर

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना, रुग्णसंख्याही वाढली होती. तेव्हा कोरोना रुग्णांना सेवा देताना रुग्णाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी रुग्णवाहिका चालक - मालकांना रुग्णांच्या नातेवाईकांकडून दामदुप्पट पैसे मिळायचे. त्यांच्याकरिता दीड ते दोन वर्षे कोरोनाने रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. मात्र, आता अमरावतीत कोरोनाची लाट पूर्णपणे ओसरली असून, अत्यल्प रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत. इतर आजारांची रुग्णसंख्याही कमी झाल्याने गत आठ दिवसांपासून रुग्णवाहिकेची चाके थांबली आहेत. “साहेब, आठ दिवसांपासून एकही भाडे मिळाले नाही ह“, अशी भावना एका रुग्णवाहिकाचालकाने व्यक्त केली.

शहरातील रुग्णवाहिका चालक - मालक संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांशी ‘लोकमत’ने चर्चा केली असता, कोरोनाकाळात आम्हाला पैसे मिळाले, मोठा रोजगारही मिळाला. आम्ही जीव धोक्यात टाकून चांगली सेवाही दिली. मात्र, आता जिल्ह्यातील रुग्ण कमी झाले असून, इतर रुग्णांमध्ये घट झाली आहे. त्यामुळे दिवसभरात एखादे भाडे मिळत असल्याचे एका रुग्णवाहिका चालकाने सांगितले. आठ दिवसांपासून इर्विन चौकात रुग्णवाहिका उभ्या आहेत. कोरोनाची पहिली व दुसरी लाट होती तेव्हा एका दिवसात एका रुग्णवाहिकेला पाच ते सहा भाडे मिळायची. अनेकदा तर रुग्णवाहिका उपलब्धच नसल्याने स्कूल बसमधून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला सुपर स्पेशालिटीत तसेच इतर ठिकाणी हलविण्यात आले.

आता मात्र, शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे रोजगार बुडाला आहे. शेकडो रुग्णवाहिका चालक - मालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

बॉक्स

कोरोनाकाळात मिळाले दामदुप्पट भाव

शहरात लहान-मोठ्या ८५ रुग्णवाहिका आहेत. ग्रामीणमध्ये तालुका पातळीवर ८० ते ९० खासगी रुग्णवाहिका कार्यरत आहेत. कोरोनाकाळात शहरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रुग्ण नेल्यास पाचशे ते हजार रुपये भाडे मिळायचे. मात्र, नागपूरला रुग्ण नेल्यास साधे भाडे ३ हजार, तर ऑक्सिजन सिलिंडर लावून साडेतीन ते पाच हजारापर्यंत भाडे मिळत होते. मात्र, आता शहरासाठी ३०० रुपये, ऑक्सिजन असेल तर ४०० रुपये, तर नागपूरकरिता ३२०० रुपयांपर्यंत भाडे आकारण्यात येत असल्याचे एका रुग्णवाहिका चालकाने सांगितले.

बॉक्स

मृतदेह उचलायचे १५०० रुपये

कोरोनाकाळात अनेकांना आपला जीव गमावावा लागला. मात्र, सुपरस्पेशालिटी किंवा मान्यताप्राप्त खासगी कोविड रुग्णालयात रुग्ण दगावल्यास त्याचा मृतदेह स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाण्याकरिता १५०० ते ३ हजारांपर्यंत भाडे मिळायचे. त्यातून अनेकांच्या उत्पन्नात भर पडली होती.

कोट

कोरोनाकाळात रोज चार ते पाच भाडे मिळायचे. आता दिवसभर रुग्णांची वाट बघावी लागत आहे. रुग्णवाहिका मालकाला चालकांना रोजगार देणे कठीण झाले आहे. आम्हाला शहरासाठी प्रतिभाडे ५०, तर नागपूरसाठी ३०० वाहन चालविण्याचा रोज मिळत होता. मात्र, आता तोसुद्धा रोजगार मिळणे कठीण झाला आहे.

- प्रशांत उचीतकर, रुग्णवाहिका चालक

कोट

कोरोनाकाळात पैसे मिळाले तरीही जीव धोक्यात टाकून प्रत्येकाने रुग्णसेवाच दिली. मात्र, आता आठ ते दहा दिवसांपासून रुग्ण कमी झाल्याने प्रत्येकाचा रोजगार हिरावला आहे.

- हिमंत उभाड, चांगापूर, रुग्णवाहिका चालक-मालक