शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

सणासुदीच्या दिवसांत भाकरी, रेशन दुकानातून गहू गायब!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 11:50 IST

Amravati : अंत्योदयसह प्राधान्य गटातील ४.९६ लाख शिधापत्रिकाधारकांमध्ये नाराजीचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : सण-उत्सवांच्या कालावधीत रेशन धान्यातून गोरगरीब लाभार्थीना गव्हाऐवजी ज्वारी देण्यात येत आहे. यामध्ये ऑगस्ट महिन्यात ज्वारीचे वाटप करण्यात आलेले आहे व पुढील तीन महिने पुन्हा ज्वारीचे वाटप होणार आहे. अंत्योदय व प्राधान्य गटातील ४.९६ लाख शिधापत्रिकाधारकांमध्ये नाराजी आहे.

आधारभूत किंमत योजनेद्वारे जिल्ह्यात ज्वारीची खरेदी करण्यात येत आहे व ही ज्वारी आता सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे अंत्योदय व प्राधान्य गटातील शेतकऱ्यांना वाटप करण्यात येत आहे. तसे आदेश राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाद्वारा २५ जून रोजी देण्यात आलेले आहे. त्यामुळे गव्हाचा कोटा कमी करण्यात आलेला आहे व त्याऐवजी ज्वारीचे वाटप करण्यात येत आहे. तसे पाहता ज्वारी ही काही गोरगरिबांची राहिली नाही. मार्केटमध्ये गव्हापेक्षा ज्वारीला भाव जास्त आहे. मात्र, रेशन धान्यात ज्वारी मिळत नाही. त्यातच सणाच्या दिवशी भाकरी केल्या जात नाहीत.

कोणत्या गटाला किती धान्य मिळते? अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी १० किलो ज्वारी, ५ किलो गहू व २० किलो तांदूळ सध्या रेशन मधून दिल्या जात आहे. आता सणउत्सवाचे दिवस असल्याने पूर्वीप्रमाणेच रेशनमधून धान्य देण्याची मागणी आहे.

प्राधान्य गट या कार्डधारकांना त्यांच्या कुटुंबातील प्रति लाभार्थी १ किलो ज्वारी व ४ किलो तांदूळ रेशन दुकानातून दिले जात आहे. त्यामुळे ज्वारी ऐवजी गव्हाचे वाटप करण्याची लाभार्थ्यांची मागणी आहे.

४.७० लाख रेशन कार्डधारकअंत्योदयचे १.२८ लाख जिल्ह्यात अंत्योदयचे १,२७,९१४ कार्डधारक आहेत. यामध्ये ४,७६,६९५ युनिटसंख्या आहे. या लाभार्थीना दरमहा ३५ किलो रेशनधान्य मिळते.

प्राधान्य गट ३.६८ लाख जिल्ह्यात प्राधान्य गटात ३,६८,०११ शिधापत्रिकाधारक आहेत. यामध्ये १४,८९,८६० युनिटसंख्या आहे. या लाभार्थीना दरमहा प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य मिळते.

गहू गायब, नुसतीच ज्वारी यावर्षी शासनाद्वारा भरडधान्याची खरेदी करण्यात आलेली आहे. त्यामुळे रेशन दुकानातून गव्हाऐवजी ज्वारी देण्यात येत आहे. यामध्ये पुढील तीन महिने ज्वारीचे वाटप होईल.

दिवाळीपर्यंत मिळणार ज्वारी ऑगस्टमध्ये २७,७९० क्विंटल ज्वारीचे वाटप झाले. यामध्ये अंत्योदय गटात १२,८०७ क्विंटल, तर प्राधान्य गटात १४,९८३ क्चिटल ज्वारीची आवश्यकता आहे. रेशनमध्ये दिवाळीपर्यंत ज्वारीचे वाटप होऊ शकते

"रेशनमधून गहू गायब झालेला नाही तर गव्हाचे वाटप सुरूच आहे व त्यासोबत काही प्रमाणात ज्वारीदेखील दिल्या जात आहे." - प्रज्वल पाथरे, एडीएसओ, अमरावती

"रेशनमधून गव्हाचे वाटप कायम ठेवण्यात यावे व सोबतच ज्वारी अन् साखरही देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे." - विमलबाई ठाकरे, लाभार्थी

"दुकानात गव्हापेक्षा ज्वारी महाग आहे. ज्वारी आरोग्यासाठी पोषकही आहे. सोबतच सणासुदीसाठी गहूदेखील द्यायला पाहिजे."- शोभा वानखडे, लाभार्थी

टॅग्स :Amravatiअमरावती