शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

काय द्यावे तिला ? कसे करावे 'इम्प्रेस'?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 23:31 IST

आजच्या दिवसाची प्रतिक्षा किती दिवसांपासून होती त्याला. मनोमन तिलाही. विविध आकर्षक भेटवस्तुंनी बाजार सजला आहे. पण त्याततले नेमके काय निवडावे जेणे करून ती इम्प्रेस होईल, या प्रश्नाच्या गुंत्यात अनेक तरूण प्रेमदिवसाच्या पूर्वसंध्येला गुरटेले होते.

ठळक मुद्देतरुणाईने फुलली बाजारपेठ

आम्ही भारतीय तसे संस्कृतीप्रिय; पण आपल्याच देशात, आपल्याच संस्कारांत लहानाचे मोठे झालेल्या तरुणांना मात्र परदेशी 'व्हॅलेंनटाईन्स डे' चुंबकाप्रमाणे आकर्षित करतो. विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अमरावती शहराच्या बाजारपेठांमध्ये आजच्या प्रेमदिवसानिमित्त दाखल झालेल्या वस्तूंचा दमदार स्टॉक त्याचा पुरावाच होय..अमरावती : आजच्या दिवसाची प्रतिक्षा किती दिवसांपासून होती त्याला. मनोमन तिलाही. विविध आकर्षक भेटवस्तुंनी बाजार सजला आहे. पण त्याततले नेमके काय निवडावे जेणे करून ती इम्प्रेस होईल, या प्रश्नाच्या गुंत्यात अनेक तरूण प्रेमदिवसाच्या पूर्वसंध्येला गुरटेले होते.गिफ्ट खरेदीसाठी तरुणाईच्या गर्दीने दुकाने फुलली आहे. आकर्षक भेटवस्तू, विविध प्रकारचे चॉकलेट्सनी बाजारपेठ सजली आहे. विशेषत्वाने गुलाब पुष्पांचा, त्यांच्या प्रतिकांचा वापर सर्वत्र आहेच. त्यामुळे फुलविक्रेत्यांनीही रोजच्या तुलनेत जोमदार तयारी केली आहे.शहरातील महत्त्वाच्या कॅफेसह काही हॉटेल्समध्ये 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करण्यासाठी काही तरुणांंनी नियोजनही केले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे वास्तव्य असणाऱ्या भागांमध्ये बघावे तिकडे तरुणांचे जत्थे दिसतात. पंचवटी चौक परिसर, मुख्य बाजारपेठ, फुलांची दुकाने तरुणाईने बहरली होती. त्याला जशी तिच्यासाठी व्यक्त होण्याची इच्छा तशीच तिलाही त्याने व्यक्त व्हावे अशी छुपी प्रतीक्षा प्रेमदिवसाच्या पूर्वसंध्येला जाणवली.चिनच्या 'मेसेज बॉक्स'ला पसंतीदरवर्षी 'व्हॅलेंटाईन डे'ला नवीन भेट वस्तू लॉन्च होते. त्याचप्रमाणे यावर्षी मेसेज बॉक्स हे स्वस्त आणि मस्त मन:पूर्वक संदेश देणारे गिफ्त बाजारपेठेत दाखल झाले आहे. एका छोट्याशा बाटलीत आकर्षक रंग व कापडाच्या विशिष्ट आकारात कोरा कागद गुंडाळून ती बॉटल गिफ्ट म्हणून देता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात'खलिता'द्वारे मेसेज पोहचविण्याची प्रथा होती. त्याची प्रचिती या माध्यमातून येणार आहे. मुलीला प्रेमाचा संदेश देण्याचा आधुनिक काळातील हा 'खलिता' चीनने साकारला असून, या वस्तू अगदी खिशाला परवडेल, अशा दरात उपलब्ध असल्याने या गिफ्टकडे तरुणाई आकर्षित होऊ लागली आहे.अंबानगरीतही पोहोचलीआॅनलाईन पुष्पवितरण सेवादिल्ली, मुंबई, पुणे, अशा लांब शहरात व विदेशात वास्तव्यास असलेले नातेवाईक त्यांच्या आप्तेष्टांना प्रत्यक्ष 'व्हॅलेंटाईन डे'ला फुल देऊ शकत नाही. अशांसाठी तंत्रज्ञानाच्या युगात अनेक अ‍ॅप निर्माण झाले आहेत. अमरावतीतही आता हे तंत्राान पोहोचले आहे. चार फुलविक्रेत्यांकडे तशी सोय आहे. आॅनलाईन आॅर्डरद्वारे संबंधितांना 'व्हॅलेंटाईन डे'निमित्त पुष्प पाहोविले जातात. १०० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंत त्यासाठीचा खर्च येत असल्याचे पुष्पविक्रत्यांनी लोकमतला सांगितले.