अमरावती : मॉडेल रेल्वेस्थानक अस्तित्वात आले आणि अंबानगरीच्या वैभवात भर पडली. परंतु या स्थानकाची उपयोगिता वाढविण्याच्या दृष्टीने आवश्यक निर्णयांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. अमरावती-नरखेड रेल्वे मार्गापासून बडनेरा-अमरावती रेल्वेमार्गाला जुन्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील नवीन उड्डाणपुलापासून सिपना कॉलेजपर्यंत कॉर्डलाईनने जोडल्यास अनेक गाड्या अमरावती स्थानकापर्यंत पोहोचू शकतील. परंतु सन २०११-१२ मध्ये मंजूर झालेल्या या प्रस्तावाचे घोडे नेमके कुठे अडले आहे, हे कळायला मार्ग नाही. या बहुउपयोगी कॉर्डलाईनचा प्रस्ताव रेल्वे विभागाने ‘न्यू अमरावती कॉर्डलाईन-वर्क्स प्रोग्राम-२०११-१२’ मध्ये मंजूर केला होता. भूमी हस्तांतरणाचा प्रस्ताव व त्याची पूर्ण रक्कम विशेष भूमी अधिकारी यांच्याकडे मध्य रेल्वेच्या निर्माण विभागाने (अकोली) जमा केली होती. ही रक्कम ५ कोटी १६ लाख २० हजार रूपये इतकी होती.
‘त्या’ कॉर्ड लाईनचे झाले तरी काय?
By admin | Updated: June 25, 2015 00:18 IST