शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीस्वारांवर कारवाई चारचाकी वाहनांचे काय ?

By admin | Updated: February 16, 2016 00:19 IST

बेशिस्त अमरावतीकर वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून महिनाभरापासून ‘वाहने उचलून आणून दंड वसूल करण्याची मोहीम सुरू आहे.

फौजदारी कारवाईला मर्यादा : वाहनचालकांचीही जबाबदारीअमरावती : बेशिस्त अमरावतीकर वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून महिनाभरापासून ‘वाहने उचलून आणून दंड वसूल करण्याची मोहीम सुरू आहे. या मोहिमेत केवळ दुचाकींना लक्ष्य केले जात आहे. त्या तुलनेत बेशिस्त चारचाकीचालक मात्र बिनधास्त वाहतूक नियमांची ऐशीतैशी करीत असल्याचे चित्र आहे. जामरची अत्यल्प संख्या पाहता वाहतूक शाखेनेही चारचाकी वाहनांवरील फौजदारी कारवाई सुरू असली तरी त्या कारवाईच्या मर्यादा स्पष्ट आहेत. शहराच्या अनेक चौकांत दुचाकींच्या तुलनेत चारचाकी वाहने रस्ता अडवून आणि वाहतुकीस अडथळा करून उभी राहत असताना त्यांच्यावर नाममात्र कारवाई केली जाते. अलीकडे वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. हा प्रयत्न स्तुत्य आहे. मात्र अशा कारवार्इंवर मर्यादा असते. ज्याप्रमाणात दुचाकींवर कारवाई केली जाते, त्याप्रमाणेच रस्ता अडवून ठेवणाऱ्या आणि नो-पार्किंग स्थळी चारचाकी वाहनांना ‘जामर’ लावून त्यांच्यावर कारवाईचा दंडुका उगारावा, अशी अपेक्षा अनेक दुचाकीस्वारांनी व्यक्त केली आहे. नो-पार्किंग असताना तासन्तास उभी करण्यात येणारी चारचाकी वाहने अतिक्रमणात भर टाकणारी आहे. शासकीय कार्यालयालगत चारचाकी वाहनांची सर्वाधिक पार्किंग अवैधरीत्या केली जाते. (प्रतिनिधी)चारचाकी वाहन चालकांचा त्रागादुचाकीस्वाराच्या तुलनेत चारचाकी वाहनचालक अधिक प्रमाणात पोलिसांशी भिडतात. प्रसंगी राजकीय पदाधिकारी वा संघटनांचा दबावसुद्धा पोलिसांवर येतो. त्यामुळे दुचाकींच्या तुलनेत चारचाकी वाहनचालकांवरील कारवाईचा आकडा अल्प आहे. त्याचबरोबर जामरची संख्या अल्प असल्यानेही चारचाकीची अवैध पार्किंग केली जाते. त्यावर अंकुश राहिलेला नाही. दुचाकींवरच बडगाशहरात अवैध पार्किंगचा व्याप वाढल्याने वाहतूक शाखेकडून ‘नो पार्किंगमध्ये असलेल्या वाहनांवर कारवाई केली जाते. दुचाकीस्वारांवरच प्रत्येकी शे-सव्वाशे रुपयांचा बडगा उगारला जातो. त्यामुळे दुचाकीस्वारांमध्ये असंतोष उफाळत आहे. वाहनचालकांची जबाबदारी नाही का ?बहुतांश वाहनचालक जागा मिळेल तेथे वाहने पार्क करतात. चारचाकी वाहनचालक मोठ्या रुबाबात रस्त्यानजीक वा कधीकधी रस्त्यावर वाहन उभे करून आपल्या कामाला निघून जातात. आपल्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा होतो का, हे पहायला बहुतांश वाहनचालकांकडे वेळ नसतो. शासकीय कार्यालय परिसरात तर उच्चभ्रू नागरिक ‘नो-पार्किंग’ झोनमध्ये बिनधास्तपणे वाहने पार्क करतात. वाहतूक नियंत्रणाची जेवढी जबाबदारी पोलिसांची तेवढीच महापालिकेची आणि सर्वात आधी वाहन चालकांची आहे, हे समजून घ्यायला हवे. जिल्हाधिकारी कार्यालय चौकात चार चाकींच्या रांगाजिल्हाधिकारी कार्यालय, एसपी कार्यालयांसह जिल्हा परिषद आणि न्यायालयाबाहेरच्या परिसरात वाहतुकीस अडथळा येईल, अशारितीने धनदांडग्यांची चारचाकी वाहने बिनधास्तपणे रस्त्यावर पार्क केली जातात. त्यांच्यावर कुणाचाही अंकुश राहिलेला नाही. जामरची संख्या कमी असली तरी वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या चार चाकी वाहनांवर कारवाई केली जात आहे. कुणालाही पाठीशी घातले जात नाही. - बळीराम डाखोरे,प्रभारी एसीपी, वाहतूक शाखा, शहर आयुक्तालय