शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
3
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
4
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
5
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
6
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
9
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
10
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
11
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
12
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
13
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
14
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
15
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
16
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
17
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
18
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
19
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
20
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 

विदर्भ गर्जना यात्रेचे वरूडात स्वागत

By admin | Updated: March 2, 2015 00:33 IST

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने विदर्भ गर्जना यात्रा नुकतीच काढण्यात आली असून ही यात्रा रविवारी तालुक्यात पोहचली.

वरुड : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने विदर्भ गर्जना यात्रा नुकतीच काढण्यात आली असून ही यात्रा रविवारी तालुक्यात पोहचली. यावेळी स्वतंत्र विदर्भ राज्य चळवळीला शक्तीशाली बनविण्याचे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे वामनराव चटप यांनी केले.स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी लढा अनेक वर्षांपासून सुरु आहे. अनेकांनी रणशिंग फुंकले प्रवाहासोबत वाहून जाणारे अनेक होते. परंतु जुने विदर्भवादी आजही आपल्या शब्दावर ठाम आहेत. येणारे नवीन चेहरे मात्र वाट मिळेल तिकडे गेलेत. निवडणूक काळात उमेदवारांनी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावरून मते मिळवली. परंतु दिलेले आश्वासन फोल ठरताना दिसत आहे. त्यामुळे विदर्भातील जनतेला जाग आणण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने विदर्भ गर्जना यात्रा काढण्यात आली. याची सुुरूवात गांधी पुतळा, व्हेरायटी चौैैक, नागपूर व समारोप मेळावा गडचिरोली येथे होणार आहे. जवळपास २ हजार १०० कि. मी. अंतराची ही यात्रा आहे. ती यात्रा वरुड तालुक्यात आली. यावेळी तालुक्यातील बेनोडा, जरूड त्यानंतर स्थानिक महात्मा फुले चौैैकात सभा घेण्यात आली. स्वतंत्र विदर्भ राज्य चळवळीला शक्तीशाली बनविण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी माजी आमदार वामनराव चटप बोलताना म्हणाले की, नागपूर करार अंतर्गत १९५६ मध्ये विदर्भप्रांत महाराष्ट्रात सामील झाला. त्यानंतर विदर्भावर अन्याय वाढतच गेला. नागपूर कराराचे पालन राज्यसरकारने केले नाही. त्यामुळे सिंचन उद्योगधंदे रोजगार, प्रादेशिक विकास इत्यादी बाबींचा बॅकलॉग सतत वाढतच गेला. परीणामत: शेती, पाणी, कोळसा, कापुस, वीज, मॅग्नीज, वनसंपत्ती सर्व प्रकारचा कच्चा माल व उद्योग धंदे, नोकऱ्या, विकास सर्वप्रकारे पश्चिम महाराष्ट्रत असे चित्र उभे झाले आहे. आमच्या वाटेला काय तर मागासलेपणा शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कुपोषण प्रदूषणामुळे कर्करोग, दमा यासारखे दुर्धर रोग, नक्षलवाद यांनी आपण ग्रस्त व त्रस्त आहोत. या सर्व बाबीतून बाहेर पडायचे असेल तर यावर एकच उपाय स्वतंत्र विदर्भ राज्य यासाठी 'विदर्भ मिळवू औैैैंदा' या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी माजी आमदार वामनराव चटप, संजय कोल्हे, दिलीप भोयर, प्रमोद कुटे, दिलीप यावलकर, शिवहरी सावरकर, दिलीप लव्हाळे, बाबाराव माकोडे, विनायक देशमुख, रघुनाथ खुजे, धनपालसिंग चंदेल, विनय फरकाडे, देवेंद्र गोरडे, साहेबराव पाटील, बाबाराव तडस, प्रकाश ठाकरे, रामरावजी वानखडे, ज्ञानेश्वर निकाजु, रामचंद्र पाटील, सुनील पावडे, अनिल वानखडे, अण्णासाहेब घोरमाडे, गजानन उपासे, पुरूषोत्तम वानखडे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)