शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कुऱ्हा येथे तणनाशक फवारणीने शेजारच्या शेतातील पिके करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 05:01 IST

चांदूरबाजार तालुक्यातील मौजा खेल खुशाल देशमुख येथील शेत सर्व्हे नंबर ५५ ते ते ५८ मधील शेतकरी तथा कुऱ्हा देशमुख येथील पोलीस पाटील पवन देशमुख यांनी आठ दिवसांपूर्वी त्यांच्या ज्वारीच्या शेतात टू-फोर डी हे अतिजहाल तणनाशक सदर कंपनीच्या निर्देशित सूचनांचे पालन न करता व कुठलीही सावधगिरी न बाळगता फवारणी केले.

लोकमत न्यूज नेटवर्ककरजगाव : चांदूर बाजार तालुक्यातील कुऱ्हा देशमुख येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात टू-फोर डी या तणनाशकाची फवारणी चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे आजूबाजूच्या शेतातील पिके करपली आहेत. त्यामुळे १६ जणांच्या ४० एकर क्षेत्रातील तूर व कपाशीच्या पिकांचे नुकसान झाले. तालुकास्तरीय समितीने नुकसानाचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तहसीलदारांकडे सोपविला आहे. चांदूरबाजार तालुक्यातील मौजा खेल खुशाल देशमुख येथील शेत सर्व्हे नंबर ५५ ते ते ५८ मधील शेतकरी तथा कुऱ्हा देशमुख येथील पोलीस पाटील पवन देशमुख यांनी आठ दिवसांपूर्वी त्यांच्या ज्वारीच्या शेतात टू-फोर डी हे अतिजहाल तणनाशक सदर कंपनीच्या निर्देशित सूचनांचे पालन न करता व कुठलीही सावधगिरी न बाळगता फवारणी केले. तणनाशक हवेच्या दिशेनुसार ४० एकर क्षेत्रावर पसरून डॉलात असलेली पिके बाधित झाल्याची तक्रार १६ शेतकऱ्यांनी शिरजगाव पोलीस ठाणे व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली होती. त्यापूर्वी काही शेतकऱ्यांनी पवन देशमुख यांच्या कानावर ही बाब घातली असता, त्यांनीच दम दिल्याचे शेतकऱ्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. पंचायत समितीचे कृषी अधिकारी एन. के. अमझरे, मंडळ कृषी अधिकारी एस. पी. दांडेगावकर, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ के.पी. सिंग, कृषिसहायक, दिनेश वऱ्हाडे यांच्या तालुकास्तरीय समितीने तक्रारदार शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केली. समितीला मौसराम दांडगे, राजेंद्र भेंडे, संजय अकोलकर, पंजाबराव अकोलकर, साहेबराव व्यवहारे, संजय ढाकूलकर, श्रीकृष्ण अकोलकर, प्रकाश अकोलकर, बाळुराम अकोलकर, जगन्नाथ अकोलकर, सुरेश अकोलकर, नितीन अकोलकर, गजानन भेंडे, विश्वास कथे, गजानन ढाकूलकर, सुनील ढाकूलकर, अनिता ढाकूलकर, गजानन ढाकूलकर, अशोक ढाकूलकर यांच्या शेतातील कपाशी व तुरीचे नुकसान निदर्शनास आले. त्यातील कपाशीची पाने निमुळती जाड व लांबट होऊन पात्या सुकून गेल्याचे दिसून येत असून, तुरीच्याही पानांचा आकार कमी होऊन शेंडे सुकले आहेत, असे निरीक्षण समितीने नोंदवले. 

समितीने या सुचविल्या उपाययोजना नवीन फूट चांगली येण्यासाठी युरिया १ टक्का (१ किलो युरिया प्रति १०० लिटर पाणी) फवारणी करावी. कॅल्शियम कार्बोनेट १.५ किंवा जिब्रॅलिक ॲसिड ५० पीपीएची फवारणी करावी

खरीप हंगामात टू-फोर डीची फवारणी अयोग्य आहे. कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूरचे शास्त्रज्ञ व पंचायत समितीच्या चमूने पाहणी केली. अहवाल तयार करण्यात आलेला आहे.- अंकुश जोगदंड तालुका कृषी अधिकारी, चांदूर बाजार

फवारणीतून पिके करपल्याच्या प्रकरणाची तक्रार प्राप्त झाली आहे. प्रकरण चौकशीत आहे. कृषी अधिकाऱ्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल.- पंकज दाभाडे ठाणेदार, शिरजगाव कसबा

 

टॅग्स :agricultureशेती