लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी/वनोजा बाग : शहरातील बालाजी प्लाॅटमधील एका २१ वर्षीय युवकाच्या घरून तलवारी, जांबीये, कट्यारी असा शस्त्रसाठा शनिवारी पोलिसांनी जप्त केला. अंजनगाव सुर्जी शहरात या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अंजनगाव पोलिसांनी चेतन चंदू चंदनपत्री (२१, रा. बालाजी प्लॉट अंजनगाव सुर्जी) याच्याकडे गोपनीय माहितीवरून २४ जुलैला दुपारी १ च्या सुमारास धाड टाकली. पोलिसांनी चार तलवारी, आठ जांबीये व दोन कट्यारी जप्त करून युवकाला ताब्यात घेतले. यापूर्वी विक्की वानखडे (२२) नामक युवकाकडून फेसबूकवर अपलोड फोटोवरून एक जप्त केली. तलवार अजय अशोक आसलकर (२४, रा. काठीपुरा, अंजनगाव) याची होती. विक्कीच्या बयाणावरून चेतनच्या घराची झडती घेण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेश राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सपकाळ, मंजूषा ढोले व इम्रान इनामदार, पोलीस कॉन्स्टेबल पवन, सरफराज, वाहनचालक भूषण तायवाडे यांनी केली.
शस्त्रे मागविली ऑनलाईनविक्की वानखडे, अजय आसलकर, चंदू चंदनपत्री यांच्याविरुद्ध आर्म्स ॲक्ट ४, २५ अन्वये गुन्हा दाखल केला. चेतन ही शस्रे ऑनलाईन विकत घेत होता आणि त्याची विक्री गावात करीत होता.
चेतन योगपटूचेतन चंदनपत्री हा विद्यापीठाचा कलरकोट प्राप्त आहे. त्याने स्पर्धा गाजवल्या. अलीकडे आंतरराष्ट्रीय ऑनलाईन स्पर्धेत त्याने पदक प्राप्त केले होते.