शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
5
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
6
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
7
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
8
संपादकीय: चोंडीचा ‘राजकीय’ घाट
9
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
10
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
11
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
12
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
13
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
14
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
15
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
16
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
17
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
18
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
19
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
20
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना

रिपाइं-जनविकास फुटीच्या मार्गावर!

By admin | Updated: January 7, 2015 22:43 IST

महापालिकेत नऊ सदस्य संख्या असलेल्या रिपाइं, जनविकास काँग्रेस, जनकल्याण आघाडी गटात फूट पडण्याची चिन्हे आहेत. तीन सदस्य कमालीचे नाराज असून ते वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

‘स्थायी’वर नजर : तीन सदस्य बहिर्गमनाच्या तयारीत; विधानसभा निवडणुकीनंतर वेगवान हालचालीअमरावती : महापालिकेत नऊ सदस्य संख्या असलेल्या रिपाइं, जनविकास काँग्रेस, जनकल्याण आघाडी गटात फूट पडण्याची चिन्हे आहेत. तीन सदस्य कमालीचे नाराज असून ते वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.२०१२ मध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आ. सुनील देशमुख यांनी जनविकास काँग्रेस तर माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता यांनी जनकल्याण आघाडीच्या नावे संघटना स्थापन करुन निवडणुकीत नशीब आजमाविले. या दोन्ही नेत्यांना महापालिका निवडणुकीत फारसे यश मिळाले नाही. जनविकास काँग्रेस सहा तर जनकल्याण आघाडीचा एकच सदस्य निवडून आला. मात्र, महापालिकेत विविध समित्यांवर अधिराज्य मिळवायचे असल्यास गटस्थापनेसाठी नऊ सदस्य संख्या आवश्यक आहे. त्यामुळे जनकल्याण, जनविकासच्या सदस्यांनी रिपाइं (आठवले गट) चे दोन सदस्य सोबत घेऊन नऊ सदस्यांनी रिपाइं- जनविकास- जनकल्याण या नावाने महापालिकेत गट स्थापन केला. या गटाचे नेते प्रकाश बनसोड हे आहेत. गटाच्या सदस्य संख्येनुसार विषय समिती अथवा स्थायी समितीत सदस्यांची नियुक्ती करण्याचा शिरस्ता आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सुनील देशमुख, जगदीश गुप्ता भाजपात प्रवेशकर्ते झाले. त्यामुळे महापालिकेत जनविकास काँग्रेस, जनकल्याण आघाडीचे सदस्य वाऱ्यावर आहेत. नेत्यांनी पक्ष बदलविल्यानंतर होणाऱ्या दुर्लक्षामुळे हे सदस्य कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. महापालिकेत त्यांना मिळणाऱ्या वागणुकीमुळे सुध्दा ते हैराण आहेत. या गटातील नऊ सदस्यांपैकी काहीच सदस्यांना महत्वाच्या जागी नियुक्ती मिळविता आली. त्यामुळे इतर सदस्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. महापालिका निवडणुकीत आ. सुनील देशमुख, जगदीश गुप्ता स्वतंत्र बॅनरखाली होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत चित्र पालटले. जनविकास, जनकल्याण आघाडीच्या सदस्यांना भाजपामध्ये जायचे नसल्याने काही सदस्य बाहेर पडण्याच्या मार्गाला असल्याचे चित्र आहे. एकेकाळचे सुनील देशमुखांचे खंदे समर्थक रतन डेंडुले यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांची साथ सोडली. विधानसभा निवडणुकीत सुनील देशमुखांविरुध्द प्रचारात रतन डेंडुले यांनी आघाडी देत रावसाहेब शेखावत यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश केला.