शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना परतीच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 05:00 IST

राज्य शासनाने ह्यअनलॉक-५ह्णमध्ये बाजारपेठ, मार्केट, दुकाने, चित्रपटगृहे, खासगी ग्रंथालये, बस, रेल्वे, लोकल ट्रेन, परराज्यातील प्रवासाला मुभा दिली आहे. ह्यमाझे कुटुंब माझी जबाबदारीह्ण या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकावर कोरोना नियमावलीचे पालन करण्याची जबाबदारी निश्चित केली आहे. मास्कचा वापर, हात धुणे आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन ही त्रिसूत्री अनिवार्य करण्यात आली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम ऑक्टोबरमध्ये जिल्ह्यात संक्रमित रुग्णांची संख्या ओसरल्याने दिसत आहेत.

ठळक मुद्देसंक्रमितांची संख्या ओसरली, मृत्युदरही नियंत्रणात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मार्च ते सप्टेंबर या काळात कोविड-१९ संदर्भात असलेले भय ऑक्टोबरमध्ये संपल्याचे चित्र आहे. ऑगस्ट, सप्टेंबर हे दोन महिने कोरोनासाठी ह्यपॉझिटिव्हह्ण ठरले, तर ऑक्टोबरमध्ये संक्रमितांची संख्या ओसरत चालली आहे. मृत्युदरही नियंत्रणात आला आहे. त्यामुळे आता कोरोनालाच ह्यआ अब लौट चले...ह्ण असे म्हणण्याची वेळ आल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहेत. प्रशासनाने तूर्तास ह्यवेट अँड वॉचह्णची भूमिका घेतली आहे.राज्य शासनाने ह्यअनलॉक-५ह्णमध्ये बाजारपेठ, मार्केट, दुकाने, चित्रपटगृहे, खासगी ग्रंथालये, बस, रेल्वे, लोकल ट्रेन, परराज्यातील प्रवासाला मुभा दिली आहे. ह्यमाझे कुटुंब माझी जबाबदारीह्ण या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकावर कोरोना नियमावलीचे पालन करण्याची जबाबदारी निश्चित केली आहे. मास्कचा वापर, हात धुणे आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन ही त्रिसूत्री अनिवार्य करण्यात आली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम ऑक्टोबरमध्ये जिल्ह्यात संक्रमित रुग्णांची संख्या ओसरल्याने दिसत आहेत. १ ते १५ ऑक्टोबर यादरम्यान १९५८ कोरोना ह्यपॉझिटिव्हह्ण आढळून आले. मात्र, १२ ऑक्टोबरपासून संक्रमितांच्या अहवालात तिहेरी आकडा आलेला नाही. त्यापूर्वी ऑगस्टमध्ये ३८९२, तर सप्टेंबर महिन्यात ५२६७ संक्रमित आढळून आले होते. हल्ली मृत्युदरातही कमालीची घसरण झाली आहे. १५ दिवसांमध्ये उपचारादरम्यान कोरोनाने ५६ रुग्ण दगावले. त्यापूर्वी ऑगस्टमध्ये ६८ आणि सप्टेंबर महिन्यात १०७ रुग्णांचा बळी कोरोनाने घेतला.१५ कोविड हॉस्पिटल, ५ हेल्थ सेंटरची सुविधाकोरोनाग्रस्तांना प्रकारे उपचार देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. काही खासगी हॉस्पिटलना रुग्णसेवेची परवानगी दिली. चाचण्यांमध्ये वाढ करून संक्रमितांचा शोध घेण्यात आला. विविध उपाययोजनांमुळे हळूहळू कोरोनावर मात केली जात आहे.- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती.कोरोना संक्रमित रुग्णांवर योग्य उपचार व्हावा, यासाठी आरोग्य प्रशासनाने जिल्ह्यात १५ कोविड हॉस्पिटल आणि पाच हेल्थ सेंटर साकारले आहे. एकूण बेड संख्या १५३६ असून, ५५० रुग्ण उपचार घेत आहेत. ९८६ रिक्त बेड अद्याप आहेत. एकूण रुग्णसंख्या बघता, कोरोनाला परतीचे वेध लागले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या