शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

तिवसा तालुक्यात मिळणार अप्पर वर्धाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:47 IST

भीषण पाणीटंचाईला सामोरे जात असलेल्या तिवसा तालुक्यासाठी वर्धा नदीच्या पात्रात रविवार १२ मे रोजीच्या रात्रीपासून दोन दिवस अप्पर वर्धा धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडून मागणीची दखल

तिवसा : भीषण पाणीटंचाईला सामोरे जात असलेल्या तिवसा तालुक्यासाठी वर्धा नदीच्या पात्रात रविवार १२ मे रोजीच्या रात्रीपासून दोन दिवस अप्पर वर्धा धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.पाणीटंचाई अधिक गडद झाल्याने अप्पर वर्धा नदीचे पाणी वर्धा नदीच्या पात्रात सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी व धरण विभागाला केली होती. त्याची दखल घेत वर्धा नदीच्या पात्रात रविवारपासून दोन दिवस पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.यावर्षी पावसाळा कमी झाल्याने व पाण्याची पातळी खाली गेल्याने अनेक गावांत पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. अप्पर वर्धा धरणाला पाणी सोडण्यात येणार असल्याने मोर्शी, तिवसा व धामनगाव रेल्वे या तालुक्याला याचा फायदा होणार आहे. अप्पर वर्धा धरणात आजघडीला १६.७९ टक्केच पाणीसाठा ुशिल्लक आहे. मागील वर्षी तो पाणीसाठा ३७ टक्के होता. दरम्यान, अप्पर वर्धामध्येच मर्यादित पाणीसाठा असल्याने दोन दिवस नदीपात्रात सोडले जाणारे पाणी अल्पच असेल, असा अनेकांचा होरा आहे. नदीपात्रात पाणी सोडल्यास मोझरी व तिवसा पाणीपुरवठा योजनेलाही याचा लाभ होणार असल्याची बाब आ. ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितली.धामणगाव तालुक्याच्या २९ गावांना दिलासाधामणगाव रेल्वे : अप्पर वर्धा धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याने तालुक्यातील २९ गावांना दिलासा मिळणार आहे. बगाजी सागर धरणात अल्प पाणी साठा असल्याने शहरातील पंचवीस हजार नागरिकांना दोन दिवसा आड पाणी पुरवठा करण्याची पाळी नगर परिषदेवर आली होती. धामणगावचे नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी मुख्यमंत्री व जलसंपदामंत्र्यांकडे अप्पर वर्धा प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी केली होती.गरज भासल्यास आणखी पाणीअमरावती : मुख्यमंत्र्यांकडे ६ मे रोजी नागपूर येथे भाजपाच्यावतीने मागणी केल्यानुसार अप्पर वर्धा धरणातून १२ मे रोजी रात्री १२ वाजता नदीपात्रात १० घनमीटर पाणी सोडले जाईल. यामुळे पाणीपुरवठा योजनेच्या विहिरींना पाणी उपलब्ध होण्यास मदत व नागरिकांना, गुरांना पिण्यासाठी पाणी मिळणार आहे. राज्य सरकार दुष्काळी उपाययोजना राबविण्यास तत्पर असून, गरज भासल्यास आणखी पाणी धरणातून सोडले जाण्याची माहिती भाजप नेत्या निवेदिता दिघडे चौधरी यांनी दिली. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई