शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
3
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
7
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
8
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
9
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
10
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
11
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
12
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
13
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
14
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
15
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
16
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
18
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
19
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
20
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री

गावकऱ्यांना घरपोच पाणीपुरवठा

By admin | Updated: April 11, 2016 00:14 IST

संपूर्ण महाराष्ट्र पाण्यासाठी तळपत असताना चांदूरबाजार तालुक्यातील वणी (बेलखेड) या जेमतेम तीन हजार लोकसंख्या असलेल्या

वणी (बेलखेड) ग्रामपंचायतचा उपक्रम : पाण्याचा दर फक्त २५ पैसे लिटरसुमित हरकुट चांदूरबाजारसंपूर्ण महाराष्ट्र पाण्यासाठी तळपत असताना चांदूरबाजार तालुक्यातील वणी (बेलखेड) या जेमतेम तीन हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या गावाने आपल्या गावकऱ्यांना शुद्ध व थंडगार पाणी घरपोच पुरवठा करण्याचा नावीन्यपूर्ण भर उन्हाळ्यात राबविला आहे. हा उपक्रम राबविणारी विदर्भातील ही पहिलीच ग्रामपंचायत आहे. पाणी म्हणजे जीवन. याच पाण्यासाठी यापुढील महायुद्ध होईल असे भविष्य अनेकदा वर्तविण्यात आले आहे. दुष्काळग्रस्त भागात पाणी पुरवठा करताना सरकारलाही तारेवरची कसरत करावी लागते. अशावेळी राज्यातील एखादी ग्रामपंचायत स्वत:हून पुढे येऊन आपल्या गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करत असेल तर शासनाला आनंदच होतो. तोही पाणी पुरवठा शुद्ध व थंडगार पाण्याचा घरपोच होत असेल तर शासनासह गावातील नागरिकांच्याही आनंदाला पारावर नसते. असाच काहीसा सर्व ग्रामपंचायतींना मार्गदर्शक ठरणारा उपक्रम वणी (बेलखेड) ग्रामपंचायतने राबविला आहे. यासाठी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन गावकऱ्यांसाठी कायमस्वरुपी शुद्धी व थंड पाण्याचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी १४ व्या वित्त आयोगातील केंद्र सरकारद्वारा देण्यात येणारा ५ लाख ३० हजार रुपयाचा निधी खर्च करण्याचाही निर्णय ग्रामपंचायतने घेतला. त्यासाठी कार्यालयाच्या कंपाऊंडमध्ये असलेल्या बोअरवेलवर आरओ मशीन बसविण्याचा विचार सर्वानुमते घेण्यात येऊन त्यानुसार अंमलबजावणी सुरू करण्यात आली. काम पूर्ण होताच त्या ठिकाणी पाण्याचे एटीएम बसविण्यात आले. याचा शुभारंभ डिसेंबरमध्ये जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी एक रुपया टाकून चार लिटर शुद्ध पाणी मिळण्याची व्यवस्था झाली. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करीत त्यांना फिल्टर पाणी देण्याची व्यवस्था तर झाली. परंतु गावकऱ्यांना थंड पाणी देऊन ग्रामपंचायतला दररोज आवक कमी होईल याचाही विचार ग्रामपंचायतने सुरू केला. त्याप्रमाणे फिल्टर मशीनसोबत चिलर मशीन बसवून २० लिटरच्या कॅनमध्ये शुद्ध व थंडगार पाणी गावकऱ्यांना घरपोच पुरवठा करण्याची व्यवस्था करून पुरवठा सुरू करण्यात आला. आज २० लिटरच्या १०० कॅन पाच रुपये प्रति कॅन दराने गावकऱ्यांना पुरविण्यात येतात. बाजारात २० लिटरच्या कॅनमध्ये शुद्ध थंडगार पाणी गावकऱ्यांना घरपोच पुरवठा करण्याची व्यवस्था करुन पुरवठा सुरू करण्यात आला. आज २० लिटरच्या १०० कॅन पाच रुपये प्रति कॅन दराने गावकऱ्यांना पुरविण्यात येतात. बाजारात २० लिटर प्रमाणे असणारे शुद्ध पाणी ही ग्रामपंचायत आपल्या गावकऱ्यांना फक्त २५ पैसे प्रति लिटर इतक्या कमी दरात पाणी पिण्यासाठी पुरविते हे या योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल. या नाविण्यपूर्ण पाणी पुरवठा योजना राबविल्याबद्दल सरपंच सूरज चव्हाण, उपसरपंच मंगेश देशमुख, सदस्य संगीता हिवराळे, देवका वासनिक, नंदा नवाडे, वैशाली जावरकर, गुलनाज परवीन नवशाद, उमेश कोठाळे, नितीन अलोणे व सचिव धनंजय देशमुख यांचे गावकऱ्यांसह तालुक्यातही सर्वांकडून कौतुक होत आहे. या पिण्याचे पाण्याचे वैशिष्ट्य असे की, ग्रामपंचायतकडून फक्त ४९ टिडीएस असलेले पाणी गावकऱ्यांना देण्यात येत आहे.