लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने २४ मार्चपासून लॉकडाऊन घोषित केला आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या डोके वर काढू लागली आहे. यादरम्यान उन्हाळ्याच्या दिवसांत भेडसावणारी पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग अलर्ट झाला आहे.सध्या शासनाने शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५ टक्क्यांवरून १० टक्के केली आहे. कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर यांनी त्याच्या अधिनस्थ असलेल्या अभियंत्याकडून पाणीपुरवठा योजनेची विशेष दुरुस्तीची ५९ व तात्पुरत्या पूरक नळ योजनेची १५ अंदाजपत्रके तयार करून मंजुरी प्रदान केली आहे. मंजूर कामांपैकी दहा लाखांपर्यंतची ५२ कामे ग्रामपंचायतींने करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी आदेश दिले आहेत. याशिवाय दहा लाखांवरील १४ कामे मंजूर कामांची निविदा ग्रामपंचायतींना देण्यासाठी कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर यांनी कागदपत्रे मागवून करारनामा करण्याकरिता बीडीओमार्फत ग्रामपंचायतींना सूचना दिल्या आहेत. उर्वरित दहा लाखांवरील कामांची निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून पाणीटंचाई निवारणार्थ कक्षाद्वारे आवश्यक माहिती जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे जिल्हा व तालुकास्तरावर समन्वय ठेवून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईची कामे ही विहित वेळेत मार्गी लावली जातील. आगामी पाणीटंचाईचे दिवस लक्षात घेता, पाणीपुरवठा विभागाने आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. टंचाईच्या समस्यांवर पाणीपुरवठा विभाग लक्ष ठेवून आहे. यंदा पाणीटंचाईची समस्या भेडसावणार नाही, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.ग्रामीण भागात दरवर्षी उन्हाळयाच्या दिवसांत पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. त्यावर तातडीने कार्यवाही करून उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने सीईओंच्या मार्गदर्शनात पाणीपुरवठा विभागाकडून खबरदारी घेतली जाईल.-राजेंद्र सावळकर,कार्यकारी अभियंता
पाणीटंचाई निवारणार्थ पाणीपुरवठा विभाग ‘अलर्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 05:02 IST
सध्या शासनाने शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५ टक्क्यांवरून १० टक्के केली आहे. कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर यांनी त्याच्या अधिनस्थ असलेल्या अभियंत्याकडून पाणीपुरवठा योजनेची विशेष दुरुस्तीची ५९ व तात्पुरत्या पूरक नळ योजनेची १५ अंदाजपत्रके तयार करून मंजुरी प्रदान केली आहे. मंजूर कामांपैकी दहा लाखांपर्यंतची ५२ कामे ग्रामपंचायतींने करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी आदेश दिले आहेत.
पाणीटंचाई निवारणार्थ पाणीपुरवठा विभाग ‘अलर्ट’
ठळक मुद्देजिल्हा परिषद : आवश्यक उपाययोजनांसाठी प्रशासन सज्ज, विभागाकडून विशेष लक्ष