शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात दोन टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 20:07 IST

पश्चिम विदर्भातील मोठे, मध्यम व लघु अशा ५०२ प्रकल्पक्षेत्रांत चार ते पाच दिवसांतील पावसामुळे पाणीसाठ्यात दोन टक्क्यांची वाढ जलसंपदा विभागाने नोंदविली आहे.

- संदीप मानकरअमरावती : पश्चिम विदर्भातील मोठे, मध्यम व लघु अशा ५०२ प्रकल्पक्षेत्रांत चार ते पाच दिवसांतील पावसामुळे पाणीसाठ्यात दोन टक्क्यांची वाढ जलसंपदा विभागाने नोंदविली आहे. मात्र, हा पाऊस पुरेसा नाही. अद्यापही अनेक प्रकल्पांची कोरड कायम असून, जोरदार पावसाची प्रतीक्षा प्रकल्पक्षेत्रात आहे. २७ जून रोजी प्रकल्पांतील एकूण जलसाठा १०.८९ टक्के होता. तो आता १२.५२ टक्के झाला आहे.  विभागातील नऊ मध्यम प्रकल्पांमध्ये १३.११ टक्के, २४ मध्यम प्रकल्पांमध्ये १६.८६ टक्के आणि ४६९ लघु प्रकल्पांमध्ये ९.०५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाणीसाठ्यात सरासरी दोन टक्क्यांची वाढ झाली असली तरी सर्वच जिल्ह्यांत दमदार पाऊस झाला नसल्याने काही जिल्ह्यांत मध्यम प्रकल्पांची स्थिती बिकट आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा होत आहे. अमरावती जिल्ह्यातील शहानूर मध्यम प्रकल्पात २९.४१ टक्के, चंद्रभागा २७.९०, पूर्णा २४.६५, सपन ३८.७३, यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस १९.४९, सायखेडा १८.६५, गोकी २०.५६, वाघाडी ११.६२, बोरगाव १०.८९, नवरगाव ४०.४६, अडाण ४.६१, अकोला जिल्ह्यातील मोर्णा १०.२३, वाशिम जिल्ह्यातील एकबुर्जी ७.३५, बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा १५.५०, पलढग ३४.८९, मस ७.२५, मन २१.१२, तोरणा १८, तर उतावळी प्रकल्पात १८.५४ टक्के पाणीसाठा आहे. अकोला जिल्ह्यातील निर्गुणा, उमा, घुंगशी, वाशिम जिल्ह्यातील सोनल आणि कोराडी प्रकल्पात शून्य टक्के जलसाठा आहे. बॉक्स मोठ्या प्रकल्पांची स्थिती मौठ्या प्रकल्पांपैकी अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाºया अप्पर वर्धा धरणात १२.२६ टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात २१.०१ टक्के, अरुणावती ९.५१, बेंबळा १८.८२, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा ५.१२, वान २५.७१, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा ६.३८ टक्के, तर पेनटाकळी प्रकल्पात १२.८७ टक्के पाणीसाठा आहे. खडकपूर्णा प्रकल्पात पाणीसाठा शून्य टक्क््यांवर आला आहे. बुलडाणा जिल्ह्यात दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे पेनटाकळी प्रकल्पात ३.८५ टक्क्याने पाणीसाठा वाढला आहे.